लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ आणि गाझियाबादमध्ये पिटबुलच्या हल्ल्यांच्या बातम्या येत असताना आता कानपुरमध्ये पिटबुलनं एका गायीवर हल्ला केला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पिटबुलनं एका गायीचा जबडा धरलेला दिसत आहे. अनेकांनी पिटबुलपासून गायीची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिटबुल गायीचा जबडा सोडत नव्हता.

हातात काठी, दांडा घेऊन अनेक जण पिटबुलपासून गायीची सुटका करण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. पिटबुलचा मालक स्वत: लोखंडाच्या काठीनं गायीची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तरीही पिटबुल गायीला सोडण्यास तयार नाही. बऱ्याच प्रयत्नांनंतर पिटबुलच्या तावडीतून गायीची सुटका झाली. पिटबुलनं जबडा धरल्यानं गाय जखमी झाली.

गोल्डी नावाचा व्यक्ती सय्यद घाटावर पुजेचं काम करतो. काही दिवसांपूर्वी त्यानं घरी पिटबुल आणले. गुरुवारी सकाळी गोल्डी घाटावर पूजा करण्यात व्यस्त होता. त्यावेळी एक गाय तिथे आली. पिटबुलनं गायीवर हल्ला केला. पिटबुलनं गायीचा जबडा धरून ठेवला. गायीनं पिटबुलची सैल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र पिटबुल गायीचा जबडा सोडत नव्हता.
मिटक्या मारत माशांवर ताव, मग पोट दुखू लागलं; रुग्णालयात पोहोचला, ८ तासांत मृत्यूनं गाठलं
पिटबुलनं जवळपास ५ मिनिटं गायीचा जबडा घट्ट पकडून ठेवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. कुत्र्यानं याआधीही गायीवर हल्ला केल्याची माहिती त्यानं दिली. काही दिवसांपूर्वीच घरी पिटबुल घेऊन आलो होतो. मात्र या घटनेनंतर पिटबुल परत देणार असल्याचं गोल्डी यांनी सांगितलं. लखनऊ, गाझियाबादमध्ये पिटबुलनं हल्ला केल्याच्या घटना घडल्या. आता एक घटना माझ्या समोर घडली. त्यामुळे इतरांच्या सुरक्षेसाठी कुत्रा परत करणार असल्याचं गोल्डी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here