रत्नागिरी : लांजा पुलावर झालेल्या अपघातानंतर अपघातग्रस्त टॅंकरमधून गॅस गळती सुरू असल्याने मुंबई-गोवा महामार्ग तब्बल १८ तासांपासून बंदच आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. हा महामार्ग सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील काजळी नदीत टँकर कोसळून गुरुवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास चालकाचा मृत्यू झाला. एलपीजी गॅस वाहतूक करत गोव्याच्या दिशेने जाणारा टँकर कठडा तोडून नदीत कोसळला. त्यानंतर टँकरमधून एलपीजी गॅसची गळती सुरू झाल्याने काल दुपारपासूनच सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबई-गोवा महामार्ग बंद करण्यात आला.

Shivsena: उद्धव ठाकरेंचा ‘राईट हँड’ बदलला? रवी म्हात्रे इन मिलिंद नार्वेकर आऊट?

वाहतूक कोणत्या मार्गाने सुरू?

मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र अपघातामुळे हा मार्ग बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरील वाहूतक लांजा-शिपोशी-दाभोळे-पाली मार्गे रत्नागिरी तसंच देवधे-पूनस-काजारघाटी मार्गे रत्नागिरी या मार्गे वळवण्यात आली आहे.

दरम्यान, अपघातानंतर तज्ज्ञांची टीम गोवा आणि उरण येथून घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्याकडून अपघातग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितरित्या बाहेर काढला जात असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here