Sale of Wine in supermarkets | सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात ड्राफ्ट हा सामान्य नागरिकांपुढे ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची मतं आणि त्याबद्दलचे विचार जाणून घेऊन पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. त्याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं ठरणार आहे. ज्या भाजपने त्या निर्णयाचा विरोध केला होता, आता तोच सत्तेत आहे.

 

Abdul Sattar: मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा, पण भाजपची परवानगी गरजेची: अब्दुल सत्तार
Abdul Sattar: मॉलमध्ये वाईन विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांच्या फायद्याचा, पण भाजपची परवानगी गरजेची: अब्दुल सत्तार

हायलाइट्स:

  • शेतकऱ्यांच्या फायद्याचे कारण पुढे करत मॉलमधील वाईन विक्रीसाठी आग्रह
  • शंभूराज देसाई यांनी जर असा प्रस्ताव आणला तर शेतकऱ्यांना फायदा होईल
मुंबई: ठाकरे सरकारच्या काळात मॉल आणि किराणा दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावरुन भाजपने प्रचंड रान उठवले होते. मात्र, आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचे दिसत आहे. विशेषत: शिंदे गटातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या फायद्याचे कारण पुढे करत मॉलमधील वाईन विक्रीसाठी आग्रह धरला आहे. या पार्श्वभूमीवर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शंभूराज देसाई यांनी जर असा प्रस्ताव आणला तर शेतकऱ्यांना फायदा होईल, असे मला कृषीमंत्री म्हणून वाटत आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांच्या परवानगिशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडी काळात सुपर मार्केटमध्ये वाइन विक्री करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षाने जोरदार विरोध केला होता. राज्य पातळीवर आंदोलनं करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या निर्णयाची अंमलबजावणी आताचं सरकार करण्याच्या तयारीत दिसत आहे. सामान्य नागरिकांचा याबाबतचा विचार घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर याबाबत अहवाल ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर कॅबिनेटमध्ये त्या स्तरावर या निर्णयासंदर्भात अंमलबजावणी होईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली होती.
‘पिणारा कुठेही जातोच ना ?’ महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांकडून वाईन विक्रीला ‘फुल सपोर्ट!’
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासंदर्भात ड्राफ्ट हा सामान्य नागरिकांपुढे ठेवण्यात येणार आहे. नागरिकांची मतं आणि त्याबद्दलचे विचार जाणून घेऊन पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे. त्याबाबत कॅबिनेट बैठकीमध्ये त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं ठरणार आहे. मात्र, ज्या भाजपने त्या निर्णयाचा विरोध केला होता, आता तोच सत्तेत आहे. त्यामुळे आता परत त्याची अंमलबजावणी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मी निर्व्यसनी… किराना दुकानात वाईन विक्रीसंदर्भात उद्धवदादांना भेटणार: बिचुकले

शंभूराज देसाई भाजपच्या नेत्यांना विनंती करणार?

मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यासंदर्भात शंभुराज देसाई भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे. भाजपच्या नेत्यांना या निर्णयाबाबत ते समजून सांगतील असेही सत्तार म्हणाले. शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्यानं सुपरमॉल्समध्ये वाईन विकण्याचा निर्णय चांगला असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here