मुंबई : टाटा समूहाने आपल्या कंपन्यांच्या एकत्रीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत टाटा समूहाच्या धातूंशी संबंधित सर्व कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन केल्या जातील. म्हणजेच समूहाच्या धातूंशी संबंधित सर्व व्यवसाय टाटा स्टील ही एकच कंपनी होईल. टाटा स्टीलने शेअर बाजाराला याबाबत माहिती दिली आणि म्हटले की, कंपनीच्या संचालक मंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत समूहातील ७ मेटल कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

टाटा समूहाचा सुपरहिट शेअर; फक्त ६ दिवसात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट
काल झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी मेटल व्यवसाय मजबूत करण्याच्या उद्देशाने टाटा स्टीलने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाने मूळ कंपनीसह तिच्या ७ उपकंपन्यांचे एकत्रीकरण मंजूर केल्यानंतर टाटा स्टीलचे समभाग आज सुरुवातीच्या व्यवहारात ४ टक्क्यांनी वाढले.

टाटा समूहाच्या स्टॉकने गुंतवणूकदार सुखावले, बाजारात उलथापालथ तरीही दोन दिवसांत दिला भरघोस रिटर्न
टाटा स्टीलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, टाटा स्टीलमध्ये विलीन होणाऱ्या समूह कंपन्यांमध्ये – टाटा स्‍टील लॉन्‍चिंग प्रोडक्‍ट्स (Tata Steel Long Products), द टिनप्‍लेट कंपनी ऑफ लि. (The Tinplate Company of India Limited), टाटा मेटालिंक्‍स लिमिटेड (Tata Metaliks Limited), टीआरएफ (TRF) लिमिटेड, इंडीयन स्‍टील एंड वायर प्रोडक्‍ट्स लिमिटेड (The Indian Steel & Wire Products Limited), टाटा स्‍टील माइनिंग लिमिटेड (Tata Steel Mining Limited) आणि एस अँड टी माइनिंग कंपनी लिमिटेड (S&T Mining Company Limited) – यांचा समावेश आहे.

या मल्टीबॅगर स्टॉकने १४ सप्टेंबर २०२२ रोजी वर्षभरात नवीन मूल्यनोंद केली
टाटा स्टीलमध्ये विलीन होत असलेल्या ७7 कंपन्यांचे (प्रत्येक स्वतंत्र योजना) बोर्ड, स्वतंत्र संचालकांची समिती आणि कंपनीच्या ऑडिट समितीने विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा आढावा घेतल्यानंतर याची शिफारस केली होती. प्रत्येक योजनेसाठी सर्व कंपन्यांना त्यांचे भागधारक, सेबी, सक्षम प्राधिकरण, स्टॉक एक्सचेंज (एनसीई, बीएसई), नियामक आणि इतर संबंधित सरकारी अधिकारी किंवा न्यायिक प्राधिकरणांकडून मान्यता घ्यावी लागेल. सेबीच्या नियमांनुसार, गरजेच्या आधारावर, योजनेची सर्व संबंधित कागदपत्रे/प्रमाणपत्रे स्टॉक एक्सचेंजला उपलब्ध करून दिली जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here