या धक्कादायक घटनेबाबत पिडीत तरुणीच्या ३२ वर्षीय बहिणीने काल निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चेतन मारुती घाडगे (वय ३१, रा. गुरुद्वारा रोड, औंध गाव) याच्यासह तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी चेतन घाडगे याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण म्हणजेच पिडीत २७ वर्षीय तरुणी काल गुरुदेवनगर येथील बेल्हेश्वर मंदीरातून देर्शन घेऊन परत येत होती.
रस्त्यावर असणाऱ्या कणीस विक्रेत्याकडून पिडीत तरुणी कणीस घेत होती. त्याचवेळी आरोपी चेतन घाडगे आणि तीन साथीदार तिथे आले. तरुणीला पाहून “काढ रे काढ कोयता, हिच्यावर वार कर”, असा दम त्यांनी भरला. त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने तेथून पळ काढला. तरुणी रस्त्याने पळत असताना आरोपींनी तिचा पाठलाग केला. त्यामुळे तरुणी गुरुदेवनगर येथील एका सार्वजनीक शौचालयात जाऊन लपली.
आरोपीही तिच्या मागे पळत या शौचालयात गेले. आरोपींनी तरुणीला पकडत अंगावर आणि गुप्तांगावर दारू ओतली. मिरची पावडर खाऊ घातली. डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर तिच्या हातावर ब्लेडने वार करत जखमी करत सर्व कपडे फाडून आरोपी तेथून फरार झाले. पोलीस उपनिरीक्षक उत्तम ओमासे पुढील तपास करत आहेत.