अहमदनगर : अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याशी निकाह करून अत्याचार करणारा श्रीरामूपर येथील कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याचे आणखी एक दुष्कृत्य उघडकीस आलं आहे. त्याने एका मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिला शेवगावमधील एका कुंटणखान्यात विकल्याची माहिती पोलीस तपासाच उघड झाली आहे. पोलिसांनी पीडित मुलीला विकत घेणाऱ्या कुंटणखाना चालक महिलेला अटक केली आहे.

श्रीरामपूरमधील मुल्ला कटर सध्या अटकेत आहे. अल्पवयीन मुलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करणे, धर्मांतर घडवून आणणे अशा आरोपांखाली मुल्ला कटर आणि त्याचे साथीदार अटकेत आहे. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. अटकेत असलेल्या कटर याच्याकडे पोलीस कसून तपास करत आहेत. या तपासात त्याच्याकडून आणखी माहिती मिळत आहे. त्याने साथीदार बाबा चंडवाल याच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीला शेवगावच्या कुंटणखान्यात विकल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेवगाव येथील कुंटणखान्यावर छापा घालून कुंटणखाना चालविणार्‍या मिनाबाई मुसवत हिला अटक केली आहे.

Pune Crime News : पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीसोबत धक्कादायक प्रकार ; मिरची पावडर आणि दारुचा वापर करून अत्याचार

कुंटणखान्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक शेवगावला गेले. तेथे नेवासा रोडवरील श्रीराम मंदिर भुखंडाच्या परिसरात मुसवत हिच्या घरी पोलिसांनी छापा घातला. पोलीस आल्याचे पाहून मिनाबाईने पळ काढला आणि शेजारील उसाच्या शेतात लपून बसली. पोलिसांनी तिला तेथून शोधून काढून अटक केली.

दरम्यान, आरोपी महिलेविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. मुल्ला कटर आणि अटकेत असलेले त्याचे चार साथीदार यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळते का? याचा पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here