Authored by रमेश खोकराळे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 23, 2022, 2:01 PM
Dussehra Melava 2022 | पोलिस आयुक्तांनी जे कारण दिले कायदा-सुव्यवस्थेचे ते विकृत आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे, कशाच्या आधारे शिवसेना असे म्हणते? आम्ही कोणत्याही दसरा मेळाव्याला परवानगी देत नाही आहोत, कोणत्याही गटाला नाही. त्यामुळे आमचे हक्क डावलले, असे म्हणण्याचाही शिवसेनेला हक्क नाही. विशिष्ट मैदानातच कार्यक्रम व्हायला हवा, हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यात स्पष्ट केल्याच्या बाबीकडे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

हायलाइट्स:
- दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उच्च न्यायालयात
- शिवसेनेला यंदा परवानगीसाठी न्यायालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत
शिवसेनेला त्याच मैदानात दसरा मेळावा करण्याबाबत कोणताही कायदेशीर हक्क नाही. मग कोणत्या कायद्याच्या आधारावर हक्क असल्याचे ते म्हणतात?, असा सवाल विचारत पालिकेच्या वकिलांनी शिवसेनेच्या याचिकेला तीव्र विरोध करण्यात आला. शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेऊ द्यावा, असे शिवसेना कायदेशीर हक्काप्रमाणे म्हणू शकत नाही. तो कायदेशीर हक्क नाही. पालिकेने कोणत्याही कारणाखाली अर्ज नाकारला असेल तरी शिवसेनेचा हक्क काय? कोणत्या कायदेशीर हक्काने ते शिवाजी पार्कसाठी दावा करतात?, असा सवाल मिलिंद साठये यांनी उपस्थित केला.
पोलिस आयुक्तांनी जे कारण दिले कायदा-सुव्यवस्थेचे ते विकृत आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे, कशाच्या आधारे शिवसेना असे म्हणते? आम्ही कोणत्याही दसरा मेळाव्याला परवानगी देत नाही आहोत, कोणत्याही गटाला नाही. त्यामुळे आमचे हक्क डावलले, असे म्हणण्याचाही शिवसेनेला हक्क नाही. विशिष्ट मैदानातच कार्यक्रम व्हायला हवा, हा मूलभूत हक्क होऊ शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने एका निवाड्यात स्पष्ट केल्याच्या बाबीकडे पालिकेच्या वकिलांनी न्यायालयाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र; पालिकेच्या वकिलांचा दावा
यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या वकिलांनी शिवाजी पार्क हे खेळण्याचे मैदान आणि शांतता क्षेत्र असल्याचा उल्लेख केला. मेळाव्यासाठी विशिष्ट जागाच मिळायला हवी, आम्हाला तिथेच जमण्याची परवानगी मिळायला हवी, असे कोणीही म्हणू शकत नाही. शिवसेनेचा तो सिद्ध झालेले हक्क नाही, असे मिलिंद साठ्ये यांनी म्हटले. २०१३मध्ये शिवाजी पार्क-खेळाचे मैदान या विषयावरील जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान ते मैदान शांतता क्षेत्र जाहीर झाल्यानंतर दसरा मेळावा तिथे घेण्याचा हक्क शिवसेनेला सोडून द्यावा लागला होता. २०१२मध्ये हायकोर्टाकडून आदेश होताना दसरा सण तोंडावर होता आणि एमएमआरडीए मैदान सुद्धा उपलब्ध नव्हते म्हणून कोर्टाने केवळ त्या वर्षापुरती परवानगी दिली होती आणि २०१३मध्ये एमएमआरडीए मैदानासाठी वेळेत अर्ज करा, असे कोर्टाने आदेशात म्हटले होते. त्यामुळे शिवाजी पार्कचे मैदान हे परंपरा म्हणून आमचा हक्क आहे, या शिवसेनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असा युक्तिवाद पालिकेच्या वकिलांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.