उत्तर प्रदेशच्या अयोध्येत वास्तव्यास असलेल्या जगवीर नावाच्या व्यक्तीचा विवाह १२ वर्षांपूर्वी पूजाशी झाला. मात्र आता त्याला पत्नीबद्दल धक्कादायक माहिती समजली. पूजाचं खरं नाव पूजा नसून हसीना बानो असल्याचं जगवीरला समजलं. त्यानं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

 

pooja haseena
अयोध्या: उत्तर प्रदेशच्या अयोध्येत वास्तव्यास असलेल्या जगवीर नावाच्या व्यक्तीचा विवाह १२ वर्षांपूर्वी पूजाशी झाला. मात्र आता त्याला पत्नीबद्दल धक्कादायक माहिती समजली. पूजाचं खरं नाव पूजा नसून हसीना बानो असल्याचं जगवीरला समजलं. त्यानं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव असल्याचा दावा त्यांनी केला. इस्लाम धर्म न स्वीकारल्यास ठार मारण्याची धमकी मिळाल्याचं जगवीरनं सांगितलं.

धर्मांतर न केल्यास शिर धडावेगळं करण्याची धमकी मिळाल्याची तक्रार जगवीरनं पोलिसात दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्यास अटक केली. एक दिवस हसीना मुलांना नमाज पठण करायला सांगत होती. जगवीरनं हसीना आणि मुलांना पाहिलं. जगवीरला संशय आला. त्यानं याबद्दल तिच्याकडे विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर हसीना दोन्ही मुलांना घेऊन प्रतापगढ येथे असलेल्या तिच्या माहेरी गेली.
पिटबुलचा गायीवर हल्ला; नदीकिनारी थेट जबडाच धरला; पाच मिनिटं धरून ठेवला; अंगावर येणारा VIDEO
हसीनानं मुलाचा खतना केल्याचं जगवीरला काही दिवसांनी समजलं. त्यानं याला विरोध दर्शवला. हसीनाच्या आई-वडिलांनी स्थानिक गुंड राजू उर्फ नसीरच्या माध्यमातून आपल्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप जगवीरनं केला. इस्लाम धर्म न स्वीकारल्यास शिर छापण्याची धमकी दिल्याचा दावाही जगवीरनं केला. यानंतर जगवीरनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १८ सप्टेंबरला पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि नासिरला अटक केली.
ट्रक थांबला, ग्रामस्थ जमले; बकऱ्या घेऊन पळाले, भररस्त्यात दिवसाढवळ्या लूट
जगवीर यांचे भावोजी राम जन्म कोरी यांना फैजाबाद रेल्वे स्थानकात एक मुलगी सापडली होती. तिनं स्वत:चं नाव पूजा सांगितलं होतं. आपल्या कुटुंबात कोणीच नसून आपण अनाथ असल्याचं तिनं सांगितलं. राम जन्म यांनी तिला घरी आणलं. मुलीला आधार मिळावा यासाठी कुटुंबियांनी जगवीरला तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं. जगवीर आणि पूजा यांचं २०१२ मध्ये कोर्ट मॅरेज झालं. यानंतर हिंदू रितीरिवाजानुसार त्यांचा विवाह झाला. या लग्नात मुलीकडून कोणीच नव्हतं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here