मुंबई : शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी तुम्ही चांगले मुल्यांकन असलेल्या शेअर्सच्या शोधात असाल तर, तुम्ही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स म्हणजेच भेल (Bharat Heavy Electricals: BHEL) कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवू शकता. ही सरकारी भागिदारी असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. कंपनीचा शेअर सध्या ६० रुपयांच्या आसपास आहे. ब्रोकरेज हाऊसने या शेअर्समध्ये गुंतवणुकीतून ७० टक्के परताव्याची शक्यता वर्तवली आहे. कोविड-१९ नंतरही गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी चांगली राहिली आहे. दुसरीकडे, कच्च्यामालाच्या किंमती कमी झाल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ होणार आहे. येत्या काळात वीज मागणी वाढल्याचा फायदाही कंपनीला मिळेल.

महिंद्रा फायनान्सला मोठा झटका; शेअर्सची किंमत १३ टक्क्यांनी घसरली, RBIच्या कारवाईचा परिणाम
ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, सध्याच्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, येत्या तिमाहीत कंपनीचे मार्जिन वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे कंपनीच्या नफ्यात वाढ होईल. परंतू यामध्ये काही जोखीम घटक आहेत, जसे की ऑर्डरची अंमलबजावणी करण्यात विलंब होणे आणि कच्च्या मालाच्या किमती वाढणे.

सुप्रीम कोर्टाचा एक आदेश अन् शेअर गडगडला, एका दिवसात कोणत्या कारणाने आली मोठी घसरण
पुढे नफ्यात वाढ अपेक्षित
ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कोविड-१९ शी संबंधित आव्हाने असूनही, भेल (BHEL) ची कामगिरी चांगली आहे. अंमलबजावणीत सुधारणा झाली आहे. आर्थिक वर्ष २२ मधील ऑर्डर वार्षिक ७६ टक्क्यांनी वाढून २३,६०० कोटींवर पोहोचल्या. आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत एकूण ऑर्डर बुक १ लाख कोटींवर पोहोचले आहे.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील या स्मॉलकॅप कंपनीच्या गुंतवणूकदारांची संपत्ती दोन वर्षांत तिप्पट
कंपनीची मजबूत आर्थिक स्थिती पाहता, ब्रोकरेजने शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी १०० रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्याच्या ५९ रुपयांच्या किंमतीपासून ते ७० टक्के मजबूत असू शकते. पहिल्या शेअरचे लक्ष्य ७६ रुपये होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here