मेमो मिळाल्यापासून होंडाचे कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत. ओव्हरपेड बोनस लवकरात लवकर परत करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी मेमोकडे दुर्लक्ष केल्यास किंवा त्याला रिप्लाय न दिल्यास त्यांच्या मासिक पगारातून बोनसची अतिरिक्त रक्कम आपोआप कापून घेतली जाईल.
बँक खात्यात जमा झालेला ओव्हरपेड बोनस कर्मचाऱ्यांना परत करावा लागणार आहे. ही रक्कम कशी परत करणार याबद्दलचा निर्णय घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना एक दिवसाचा अवधी देण्यात आला आहे. आताच रक्कम परत करणार की महिन्याच्या पगारातून त्यांना तो कापून घ्यायचा आहे, याची माहिती कर्मचाऱ्यांना कंपनीला द्यावी लागेल. कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, भरपाई या गोष्टी संवेदनशील असल्याचं होंडाच्या प्रवक्त्यांनी ई-मेलच्या माध्यमातून सांगितलं आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला होंडा मोटर्सनं आपल्या असोशिएट्सला बोनस दिला. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांना ओव्हरपेमेंट करण्यात आल्याचं होंडाकडून सांगण्यात आलं आहे. कंपनीचा मेमो पाहून कर्मचारी अडचणीत आले आहेत. रक्कम परत करणं कठीण असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मॅरिसविलेच्या कारखान्यात ऍकॉर्ड, सीआर-व्ही, इंटेग्रा, टीएलएक्स आणि एनएसएक्सचं उत्पादन केलं जातं.