नवी दिल्ली: समुद्रातून एका जहाजाचे अवशेष सापडले आहेत. विशेष बाब म्हणजे जहाजाच्या ढिगाऱ्यातून उत्तम प्रकारे जतन केलेली अनेक प्राचीन भांडीही सापडली आहेत. या भांड्यांमधून सुमारे १३०० वर्षे जुन्या वस्तू सापडल्या आहेत.

हे जहाज इस्रायलच्या किनाऱ्यावर सापडले आहे. शोधकर्त्यांनी म्हटले आहे की, जहाज वेगवेगळ्या भूमध्यसागरीय भागातील मालाने भरलेले होते. सातव्या शतकात इस्लामिक साम्राज्याची स्थापना झाल्यानंतरही या ठिकाणी पाश्चात्य देशांतील लोक व्यापारासाठी येत असत याचा पुरावा हे जहाजे आहे. हे जहाज बुडण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. व्यापाऱ्यांनी भरलेले हे जहाज मॅगन मायकेल या विद्यमान इस्रायली तटीय समुदायाकडून सापडले आहे.

हेही वाचा –माणसं वारंवार पडतायेत आजारी, कनेक्शन थेट बेडकांशी; अहवालातून चिंताजनक माहिती समोर

अहवालात असे सांगण्यात आले आहे की, हे जहाज त्या काळातील आहे, जेव्हा पूर्व भूमध्यसागरीय भागातून ख्रिश्चन बायझंटाईन साम्राज्य कमी होत होते आणि या भागात इस्लामिक शासक मजबूत होत होते.

Ancient Shipwreck

समुद्राच्या पोटात सापडला १३०० वर्ष जुना खजिना

सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ डेबोरा सिविकेल यांनी सांगितले, हे जहाज ७ व्या किंवा ८ व्या शतकातील असेल. धार्मिक विभागणी असूनही तेव्हा या भूमध्यसागरीय भागात व्यापार चालू होता, असे पुरावे आहेत.

हेही वाचा –पाचंही बोटं तुपात, या देशात सापडला सोन्याचा मोठा खजिना, सरकारचा आनंद गगनात मावेना

सामान्यतः इतिहासाच्या पुस्तकांमध्ये असे सांगितले जाते की इस्लामिक राजवटीच्या विस्तारानंतर या भागातील व्यापार ठप्प झाला होता. तेव्हा भूमध्यसागरात आंतरराष्ट्रीय व्यापार नव्हता. पण, आता तसे दिसत नाही. आमच्याकडे एका मोठ्या जहाजाचा ढिगारा आहे. आम्हाला वाटते की हे जहाज प्रत्यक्षात २५ मीटर लांब असेल, असंही डेबोराह म्हणाल्या.

जहाजाजवळ सापडलेल्या कलाकृतींवरून हे जहाज इजिप्तमधील सायप्रसमधून येथे आले असावे किंवा ते तुर्कीचे असावे असा अंदाज वर्तविला जात आहे. ते उत्तर आफ्रिकेच्या किनाऱ्यावरून इथे आला असावं.

हेही वाचा –मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार

इस्रायलचा किनारा शतकानुशतके बुडत असलेल्या जहाजांनी भरलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. येथे बुडालेल्या जहाजांच्या ढिगाऱ्याबाबत माहिती गोळा करणे सोपं आहे, कारण या भागातील पाण्याची पातळी कमी असते आणि वाळूच्या पृष्ठभागामुळे कलाकृती सुरक्षित राहतात.

सध्याच्या शोधाबद्दल सांगायचं झालं तर, शोधकर्त्यांना या जहाजात २०० माठ सापडल्या आहेत. यामध्ये भूमध्य प्रदेशातील खाद्यपदार्थ जसे की माशाची चटणी आणि विविध प्रकारचे ऑलिव्ह, खजूर आणि अंजीर सापडले आहेत. दोरखंड आणि कंगव्यासारख्या वैयक्तिक वस्तू, तसेच काही प्राण्यांचे अवशेषही ढिगाऱ्यात सापडले आहेत.

कोल्हापूरच्या कविता चावलांचं करोडपती होण्याचं स्वप्न २२ वर्षांनी पूर्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here