तुम्हाला काही गरज नव्हती, तुम्हाला परवानगी मिळाली होती. विश्वासघातकी माणसं आहेत. मात्र, देशात न्यायव्यवस्था आहे. लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था एक स्तंभ आहे. उद्धव ठाकरेंनी आज सकाळी देखील न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला होता. हा विजय शिवसैनिकांचा असल्याचं अरविंद सावंत यांनी म्हटलं.
हा विजय शिवसैनिकांचा आहे, विपरित परिस्थितीत सगळे गेले मात्र शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले. गटप्रमुखांचा मेळावा ऐतिहासिक होता. शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या शिवसेनेचा गर्दीचा रेकॉर्ड मोडला जाईल, असं अरविंद सावंत म्हणाले. हा पाया आहे हा कळस रचायचा आहे, असं सावंत यांनी म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयानं देखील ताशेरे ओढले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर देखील कोर्टानं ताशेरे ओढले. बीकेसीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा नाही, मग शिवाजी पार्कवर कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा कसा, असा सवाल अरविंद सावंत यांनी केला.
विनायक राऊत यांनी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. आज न्यायव्यवस्थेचं आभार मानत शिंदे गटाकडून आणि भाजपकडून दसरा मेळाव्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका आमदाराकडून त्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहिल, असं विनायक राऊत म्हणाले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं विचारलं असता सर्वोच्च न्यायालयात देखील आमच्या बाजूनं निर्णय येईल, असं विनायक राऊत म्हणाले.
शिवाजी पार्कवर आव्वाज शिवसेनेचाच, ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला हायकोर्टाची परवानगी!
मुंबईचे लचके तोडणारी गिधाडं, जनावरं आहेत ही; उद्धव ठाकरेंनी घेतला चांगलाच समाचार