नागपूर : आजच्या सामन्यानंतर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला होता. मात्र, सामन्यानंतर तर सोडाच सामना सुरू होण्यापूर्वीच जामठा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी तयार झाली होती. सामन्यासाठी निघालेली भारतीय संघाची बसच या वाहतूक कोंडीत अडकली तर सर्वसामान्यांची काय गत. त्यामुळे पोलिसांच्या ‘ग्रीन कॉरिडॉर’चा चांगलाच फज्जा उडाला.

सहसा क्रिकेट सामन्यानंतर शहरात येणाऱ्यांकडून वाहतुकीची कोंडी होते. ती टाळण्यासाठी जामठा ते रहाटे कॉलनीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला होता. या दरम्यान प्रेक्षकांव्यतिरिक्त रस्त्यावरची वाहतूक इतरत्र वळविण्यात येणार आली होती. मात्र, सामना सुरू होण्यापूर्वीच या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. विशेषत: वर्धा मार्गावरील चिंचभूवन ते जामठा या पट्ट्यात ही कोंडी बघायला मिळाली.
VIDEO | मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी, शेजारी बसून संदिपान भुमरेंचा आँखों ही आँखों में इशारा
पावसामुळे नागपूरचा दुसरा ट्वेन्टी-२० सामना आता उशिरा सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील षटकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर हा सामना किती षटकांचा होईल, हे पंचांनी आता स्पष्ट केले आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया संघ :

ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.

रश्मी ठाकरेंना महिला शिवसैनिकांनी खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here