Authored by किशोर पाटील | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 23, 2022, 9:58 PM

Jalgaon News : जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत पोलिसांची कारवाई सुरु होती.

 

Jalgaon Local news
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तरुणाचा जीव देण्याचा प्रयत्न; पोलिसांमुळे अनर्थ टळला

हायलाइट्स:

  • अंगावर पेट्रोल टाकून तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
  • जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील घटना
  • जळगावातील धक्कादायक घटना
जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. करोना काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात भाडेतत्त्वावर लावलेल्या रुग्णवाहिकेचे थकीत रक्कम शासनाकडून न मिळाल्याने चाळीसगाव येथील धीरज अशोक कोसोदे (रा. वृंदावन नगर) या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ उडून खळबळ उडाल्याचे पहायला मिळाले.

त्याच्याकडे खासगी रूग्णवाहिका आहेत. त्यावर आपला उदरनिर्वाह करतो. करोना काळात चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने धीरज कासोदे याच्या तीन रुग्णवाहिका भाडेतत्त्वावर लावल्या होत्या. या तीनही रुग्णवाहनाने दिलेल्या मुदतीत आपली सेवा बजावली होती. या कालावधीत तीनही रुग्णवाहिकेचे एकूण १५ लाख ५१ हजार ४०० रुपये शासनाकडे थकीत आहे. ही थकीत असलेली रक्कम मिळावी. यासाठी धीरजने वारंवार मागणी केली. त्याच्या मागणीची चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाने कुठलीही दखल घेतली नाही.

धक्का देऊन कालव्यात फेकलं; रिसेप्शनिस्ट अंकिताला संपवणारा भाजप नेत्याचा मुलगा आहे तरी कोण?
धीरजने कर्ज काढून रुग्णवाहिका घेतलेल्या आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते देखील थकले. तरुणाने केलेल्या मागणीची कुठलीही दखल न घेतल्याने अखेर शुक्रवारी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान जिल्हा पेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे तातडीने धाव घेत तरुणाच्या हातातील पेट्रोलची बाटली व आगपेटी जप्त केली. जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनेनंतर तरुणाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याबाबत पोलिसांची कारवाई सुरु होती.

रश्मी ठाकरेंना महिला शिवसैनिकांनी खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here