Hapus News : आंबा (Mango) खवय्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कोकणचा हापूस (Hapus) लवकरच बाजारपेठेत दाखल होणार आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात कोकणातील हापूस आब्यांची चव चाखता येणार आहे. तळकोकणात देवगड (Devgad) हापूसला बदलत्या वातावरणामुळं मोहोर लागला आहे. त्यामुळं यावर्षी दरवेळीपेक्षा लवकरच कोकणचा हापूस बाजारात दाखल होणार आहे. दरवर्षी हिवाळा सुरु झाल की आंब्याला मोहोर येत असतो आणि फेब्रुवारी महिन्यात आंबे बाजारपेठेत दाखल होत असतात.

आंब्याचा मोहोर टिकवून ठेवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान 

कोकणचा फळांचा राजा हापूस आंबा यावर्षी खवय्यांना लवकरच मिळणार आहे. यावर्षी देवगड हापूसची चव जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चाखता येणार आहे. सध्या वातावरणातील बदलांमुळं देवगड, विजयदुर्ग, मालवण, वेंगुर्ले या सागरी पट्टात हापूस आंब्यांना मोहोर आला आहे. हा मोहोर टिकवून ठेवण्याचं आव्हान आंबा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र, हा मोहोर वातावरणातील बदलांमुळं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळं झाला असल्याचं मतं शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रामुख्यानं कोकणात आंब्याना मोहोर येतो. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात खारे वारे आणि हवामानात होणाऱ्या बदलांमुळे मोहोर आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी योग्य काळजी घेऊन कीटकनाशके फवारणी करावी. तसेच प्लास्टिक आच्छादन करुन पावसापासून संरक्षण करावं, असे आवाहन करण्यात आलं आहे. 

भूगर्भातील हालचाली आणि वातावरणातील बदल यामुळं आंब्याना अवेळी मोहोर

किनारपट्टी भागात कातळ भूभाग आणि जांभा दगड युक्त जमीन आहे. भूगर्भातील हालचाली आणि वातावरणातील बदल यामुळं आंब्याना अवेळी मोहोर येतो अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. हा मोहोर टिकवणं खूप जिकरीचं काम असतं. त्यामुळं हा मोहोर टिकवून यापासून आंबे बाजारपेठेत येईपर्यंत होणारा खर्च आणि उत्पादनातून मिळणारा नफा याचाही ताळमेळ बसवावा लागतो. जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वार्मिंगचा परिणाम असल्याचं आंबा बागायतदार सांगतात. त्यामुळे सततच्या बदलत आणलेल्या वातावरणामुळे अश्या प्रकारे मोहोर येतो. मात्र हिवाळा सुरू झाला की जो मोहोर येतो तो खऱ्या अर्थाने आंब्याना फुलोरा येतो आणि फेब्रुवारी महिन्यात आंबे मिळतात. 

मोहोर टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च होणार

आंब्याला आलेला मोहोर हा सीजनच्या अगोदर आला आहे. हा मोहोर टिकवण्यासाठी शर्थिचे पर्यत्न करावं लागणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. चांगली औषधे वापरावी लागणार आहेत पावसाचा परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी घालणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यासाठी खर्च होणार आहे. थंडीच्या वातावरणात आंब्याला मोहोर येतो, पण यावर्षी लवकर आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here