एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना त्यांच्या स्नुषा रक्षा खडसे या मात्र भाजपच्या खासदार आहेत. यावरून टीका केली जात असून याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, ‘एका घरात दोन पदं आहेत, हे काही फक्त माझ्याबाबतीत नाही. गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्याही घरात दोन पदे आहेत. राजकारण ज्याच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांनी लोकं साथ देतात आणि ज्याच्यात क्षमता नाही त्याला पराभूत करतात,’ असं प्रत्युत्तर खडसे यांनी टीकाकारांना दिलं आहे.
अमित शहा-एकनाथ खडसे भेटीवर काय म्हणाल्या रक्षा खडसे?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर सभेत भाषण करताना एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली असल्याचा दावा केला होता. तसंच पाटील यांनी गुरुवारी जळगावात पत्रकार परिषदेत खडसे यांनी अमित शहांची भेट घेतल्याचा पुनरुच्चार केला होता. दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांमुळे एकनाथ खडसे हे भाजपात जाणार की काय अशाही चर्चा आता सुरु झाल्या होत्या. यावर रक्षा खडसे यांना विचारले असता, काही जण याविषयाचं राजकारण करत असून खडसे राष्ट्रवादीतच असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते भाजपात परत येणार का याबाबत कल्पना नसल्याचंही रक्षा खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.