नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरालगत असलेल्या गोकुंदा येथील दत्तनगर भागातून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र मुलीच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा डाव फसला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. श्वेता दत्ता झळके असं सदर मुलीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्तनगरमध्ये राहणारी श्वेता झळके ही १३ वर्षीय मुलगी आपल्या मैत्रिणीकडे जात असताना अचानक तिच्या पाठीमागून एक रिक्षाचालक आला. त्याने श्वेताला मारहाण करत रिक्षात बसवले आणि तिच्या तोंडावर रुमाल टाकून बेशुद्ध करत किनवट रेल्वे स्टेशन परिसरात नेले. श्वेताला दुपारी २ वाजताच्या सुमारास शुद्ध आल्याने तिने रिक्षावाल्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत पळ काढला.

अमित शहांच्या भेटीची चर्चा, कमळ हाती घेणार? एकनाथ खडसेंचं रोखठोक उत्तर

नंदिग्राम एक्सप्रेस किनवट रेल्वे स्थानकावर आल्यानंतर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याने श्वेताला गर्दीचा फायदा घेत आपले घर गाठता आले. तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरी आईला आणि आजीला सांगितला. दत्तनगर भागातील नागरिकांनी श्वेताला किनवट पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी श्वेताची चौकशी करून तिला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे पाठवले.

Nirmala Sitharaman : सितारामन बारामतीत म्हणाल्या, ‘एकाच कुटुंबावर छप्पर फाड सोने पडते तर…’

श्वेताच्या पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्या रिक्षात एक बुरखा घातलेली महिला आणि चालक पुरुष असे दोघेजण होते. ते दोघेजण नेमके कुठून आले होते? ते किनवट शहरातील होते का? अपहरण करण्यामागचा हेतू काय होता? असे अनेक प्रश्न या घडलेल्या अपहरण प्रकरणानंतर चर्चिले जात आहेत.

दरम्यान, किनवट शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालं असून किनवट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here