मुंबई: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सुरूच असून शुक्रवारी त्याने आतापर्यंतची नीचांकी पातळी तोडूनही ८१चा टप्पा पार केला आहे. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.२० रुपयांपर्यंत घसरला होता आणि गुरुवारच्या तुलनेत त्यात ४१ पैशांची मोठी घसरण पाहायला मिळत आहे. रुपया ८१.२० रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर घसरला असून त्यामुळे चलन बाजार तज्ञ ते आयातदार आणि व्यापार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम
याचे कारण म्हणजे रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारे परिणाम होतो आणि भारतीय अर्थव्यवस्थाही यापासून अस्पर्शित राहणार नाही. कमजोर रुपयामुळे आयात महागते आणि देशांतर्गत उत्पादन व जीडीपीला धक्का बसतो. याशिवाय रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर कसा विपरित परिणाम होतो, ते सामान्य माणसाच्या अर्थव्यवस्थेवर आणि देशापासून घराघरापर्यंतचे बजेट विस्कळीत होते हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया पुन्हा घसरला, रुपयाची किंमत कशी ठरते; अमेरिकी चलनाशी तुलना का?
कच्चे तेल महागणार – देशाच्या महागाईत भर
भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आयात करतो आणि डॉलरच्या किमतीमुळे कच्च्या तेलाची खरेदी करण्यासाठी अधिक खर्च येईल कारण कच्च्या तेलाचे पेमेंट डॉलरमध्ये केले जाते. यामुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढतील. यावर्षी पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आधीच अनेक शहरांत १०० चा टप्पा आकडा गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेल महाग झाल्यास भाजीपाल्यापासून दैनंदिन वस्तूंच्या वाहतुकीच्या खर्चावर खोलवर परिणाम होऊन सर्व प्रकारच्या वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल. म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील भाजीपाल्यापासून डाळीही महाग होतील. परिणामी रुपयाच्या कमजोरीचा सर्वाधिक परिणाम महागाईवर होण्याची शक्यता आहे.

ग्राहकोपयोगी वस्तू महागणार
भारतीय रुपयाची अमेरिकन डॉलरच्या तुलनेत घसरलेली किंमत आयात केलेले भाग महाग होतील, ज्याचा ग्राहक टिकाऊ वस्तू उद्योगावर नकारात्मक परिणाम होईल. हा उद्योग अत्यंत महत्त्वाच्या भागांसाठी आयातीवर अवलंबून आहे. टीव्ही, फ्रीज, एसीपासून ते अनेक नियमित मागणी असलेल्या वस्तू ज्यात आयात केलेले भाग वापरले जातात.

रुपयाच्या घसरणीचा वाहन क्षेत्रावर परिणाम, गाडी खरेदी करणे किती महागणार? समजून घ्या गणित
या क्षेत्रांच्या उत्पादनांची किंमत वाढते – उत्पादन महाग होण्याची भीती
रत्ने आणि दागिन्यांसह पेट्रोलियम उत्पादने, ऑटोमोबाईल, मशिनरी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी उत्पादनांचा खर्च वाढतो. यामुळे त्यांच्या मार्जिनवर परिणाम होतो, जो त्यांनी ग्राहकांवर पडल्यास या क्षेत्रांशी संबंधित उत्पादने महाग होतात.

परदेशात जाण्यापासून उपचारही महागणार
रुपयाचे अवमूल्यन आणि डॉलर महाग झाल्याने तुम्हाला एका डॉलरसाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. यामुळे परदेशात सुट्या आणि उपचारांचा खर्च वाढणे स्वाभाविक आहे कारण या सर्वांवर डॉलरमध्ये खर्च करावा लागतो. रुपयाच्या घसरणीमुळे परदेश प्रवास आता पूर्वीपेक्षा जास्त महागणार आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, भारतीय चलनातील घसरणीचे काय आहे कारण
परदेशात शिक्षणही महागणार
परदेशी शैक्षणिक संस्थांकडून फी म्हणून आकारण्यात येणाऱ्या प्रत्येक डॉलरसाठी आता सर्वसामान्यांना अधिक रुपये खर्च करावे लागतील. यामुळे तुमच्या अभ्यासाचा एकूण खर्च अपेक्षेपेक्षा जास्त वाढेल.

मोबाईल फोनच्या किंमतीवर परिणाम
रुपयाच्या घसरणीचा सर्वात जास्त परिणाम अशा वस्तूंवर होतो, ज्यात आयात केलेले भाग वापरले जातात. भारतात या श्रेणीत सर्वाधिक मागणी असलेली वस्तू म्हणजे मोबाईल फोन. मोबाईल फोनच्या महागड्या भागांमुळे त्यांच्या उत्पादनापासून ते असेंबलिंगपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेचा खर्च वाढतो, त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here