मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर लवकरच आई बाबा होणार, हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. बिपाशानंच काही महिन्यांपूर्वी आपण गरोदर असल्याचं सांगितलं होतं. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम झाला. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

अलका कुबल, प्रिया बेर्डे यांना न्यायालयीन दणका, भरावे लागणार १० लाख

मोजकेच मित्र मैत्रिणी आले होते
बिपाशा फोटोत खूप सुंदर दिसत आहे. तिनं पिच कलरचा गाऊन घातला होता. अतिशय हलका मेकअप केलेला. करण सिंह ग्रोवर निळ्या रंगाच्या सुटात दिसतोय. या कार्यक्रमाला २० ते २५ जण उपस्थित होते.

बिपाशा बासू डोहाळे जेवण


खास होतं बिपाशाचं डोहाळे जेवण

ई टाइम्सला या डोहाळे जेवणाचे फोटो मिळालेत. या कार्यक्रमाचा टॅग लाइन होती, ‘अ लिटिल मंकी इज ऑन द वे’ ( छोटा माकड येऊ घातलाय ). गोड बाळाची तर तमाम चाहते वाट पहात आहेत. या कार्यक्रमाचा ड्रेस कोडही होता. स्त्रिया पिच किंवा पिंक कलरच्या ड्रेसमध्ये आणि पुरुष वर्ग लव्हेंडर किंवा निळ्या रंगाच्या पोशाखात होता. शिवाय कोविडचे सगळे नियम पाळणंही गरजेचं होतं.

बिपाशा-करण

२०१५ मध्ये भेटले बिपाशा-करण
२०१५ साली अलोन सिनेमात बिपाशा आणि करण यांनी एकत्र काम केले होते. त्यापूर्वी करण हा मालिकांमध्ये काम करत होता, तर बिपाशाने मोठ्या पडदयावर अनेक बोल्ड भूमिका केल्या होत्या. अलोन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोघांची जवळीक वाढली. २०१६ मध्ये बिपाशा आणि करण यांनी लग्नं केलं. बिपाशाचं हे पहिलं लग्नं असलं तरी करणची आधी दोन लग्न झाली होती. त्यांच्यापासून करणने घटस्फोट घेतला असून बिपाशा ही करणची तिसरी बायको आहे.

मला त्यांचा नेहमीच आधार वाटत आलाय, अनिरुद्ध कोणाबरोबर असतो नेहमी निश्चिंत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here