सीबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा अनेक टोळ्या ओळखल्या गेल्या आहेत ज्या केवळ बाल लैंगिक पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्री वापरत नाहीत तर त्या मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल देखील करतात आणि त्यांचा वापर करतात. या टोळ्या गट तयार करून वैयक्तिकरित्या काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
सीबीआयला येथून माहिती मिळाली
सीबीआयला सिंगापूरमधून इंटरपोलच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीबीआय आता अॅक्शन मोडमध्ये आली आहे. सीबीआयचे हे छापे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पटणासह २० राज्यांमध्ये सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनूसार, गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ‘ऑपरेशन कार्बन’ होते.