९व्या वार्षिक फोरम ऑफ पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया (PAFI) मध्ये राजीव चंद्रशेखर म्हणाले, “कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांवर ताशेरे ओढू नयेत. कर्मचार्यांक त्यांनी स्वप्ने रोखू नयेत.” केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, कराराअंतर्गत कर्मचार्यांना कोणतेही बंधन न ठेवता त्यांना हवे ते काम करण्याची मुभा देण्यात यावी. कार्यसंस्कृती बदलली असून ती ओळखणाऱ्या कंपन्या यशस्वी होतील असे ते म्हणाले. “प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि अधिक कमवायचे असते.”
विप्रोकडून ३०० कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
केंद्र सरकारच्या मंत्र्याचे हे विधान महत्त्वाचे आहे कारण नुकतेच विप्रो, या दिग्गज आयटी कंपनीने मूनलाइटिंगमुळे ३०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. विप्रोने कर्मचार्यांनी मूनलाइटिंग करणे ही कंपनीची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. याशिवाय इन्फोसिसने देखील कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेलद्वारे इशाराही दिला आहे. तर TCS आणि आयबीएमसारख्या आयटी कंपन्याही मूनलाइटिंगला कडाडून विरोध करत आहेत. “कर्मचाऱ्यांना त्यांच्या कौशल्याने अनेक गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि ही एक कल्पना आहे ज्याची वेळ आली आहे,” असेही केंद्रीय मंत्री म्हणाले.
मूनलाइटिंग म्हणजे काय?
जेव्हा एखादा कर्मचारी त्याच्या नेहमीच्या नोकरीशिवाय पैसे कमवण्यासाठी एकाच वेळी इतर काम करतो तेव्हा त्याला मूनलाइटिंग म्हणतात. करोनाच्या काळात घरातून काम केल्यामुळे मूनलाइटिंगचा कल वाढला आहे. यामुळे कामगिरी आणि कामावर परिणाम होत असल्याचे आयटी कंपन्यांचे मत आहे. एका ईमेलमध्ये, इन्फोसिसने म्हटले की ते “दुहेरी रोजगाराला मान्य करत नाही”.
त्याचवेळी, कंपन्या पगारवाढ किंवा प्रोत्साहन इत्यादींमध्ये टाळाटाळ करत असल्याचा कर्मचार्यांचा युक्तिवाद आहे. म्हणूनच कर्मचारी शक्य तितक्या वेळ नवीन पर्याय शोधत आहेत, ज्यामधून त्यांना काही पैसे मिळतात.