पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुदाम कुदळे असं या जवानाचे नाव आहे. ते मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते. गणपतीसाठी विजय कुदळे हे साताऱ्यात आपल्या गावी सुट्टीवर आले होते. विजय कुदळे हे आपली रजा संपवून ड्युटीवर जाणार होते. पण त्यापुर्वी साताऱ्यातील अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवयात्रा संपवली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
विजय कुदळे यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे अद्याप समजू शकले नाहीये. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. याबद्दलचा अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी साताऱ्यात हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. येथे मॅरेथॉनदरम्यान एका धावपटूचा मृत्यू झाला होता. हृदविकाराच्या झटक्याने या धावपटूचा मृत्यू झाला होता. हा धावपटू कोल्हापूरातील होता. हा हा धावपटू राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याची माहिती देखील समोर आली होती. राज पटेल असं या खेळाडूचं नाव आहे. मॅरेथॉनदरम्यान धावताना त्याला हृदविकाराचा झटका आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.