बीजिंग: चीनमध्ये सत्तांतर होत असल्याची चर्चा आहे. या प्रकारच्या अफवा वणव्यासारख्या पसरल्या आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. चीनशी संबंधित असलेल्या सोशल मीडियावरून याबद्दल विविध प्रकारचे दावे केले जात आहेत.

अनेक माध्यमांवर जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा असताना भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट केलं आहे. चीनमधून पसरलेल्या या अफवेचा तपास व्हायला हवा. जिनपिंग समरकंदमध्ये शांघाय सहकारी संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले असताना कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लष्कराच्या प्रभारी पदावरून हटवलं. त्यानंतर त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं, अशी अफवा असल्याचं स्वामींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चीनमध्ये लष्कराच्या हालचालींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमधील कम्युनिस्ट पक्षानं जिनपिंग यांना लष्करप्रमुख पदावरून हटवून नजरकैदेत ठेवल्याचा दावा चीनशी संबंधित अनेक सोशल मीडिया अकाऊंट्सवरून केला जात आहे. लष्करानं बीजिंगवर कब्जा केला आहे. चीनचे माजी राष्ट्रपती हू जिनताओ आणि माजी पंतप्रधान वेन जियाबाओ सक्रिय झाल्याची माहिती चीनशी संबंधित सोशल मीडियावरून समोर येत आहे.
पुतीन यांच्या घोषणेनं रशियात खळबळ; नागरिक देश सोडण्याच्या तयारीत, फ्लाईट्स फुल्ल
शी जिनपिंग समरकंदहून परतताच १६ सप्टेंबरलाच त्यांना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं, असा दावा अफवांमधून केला जात आहे. जिनपिंग यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची दाट शक्यता आहे. चीनमधील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. मात्र या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here