उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात तीन तलाक पीडितेनं हिंदू धर्म स्वीकारला. हिंदू धर्म स्वीकारून महिलेनं प्रियकराशी विवाह केला. पती दररोज मद्यधुंद अवस्थेत मारहाण करायचा, असा आरोप महिलेनं केला आहे. पती नशेत तीन तलाक दिला. त्यानंतर मी प्रियकरासोबत लग्न केलं, असं महिलेनं सांगितलं.

हल्द्वानीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या शोएबसोबत ९ वर्षांपूर्वी रुबिनाचा निकाह झाला. हा प्रेमविवाह होता. शोएब आणि रुबीना यांना ३ मुलं झाली. शोएब रुबिनाला दररोज मारहाण करायचा. दारू पिऊन शिवीगाळ करायचा. त्यामुळे रुबिना त्रस्त झाली होती. अनेकदा सांगूनही शोएब दारू पिणं कमी करत नव्हता. त्याच्या सवयी बदलत नव्हत्या. आठवड्याभरापूर्वी त्यानं रुबिनाला तलाक दिला.
शोएबनं तलाक दिल्यानंतर रुबिनानं प्रेमपालसोबत बरेलीच्या मढिनाथ येथील मंदिरात जाऊन कुटुंबियांच्या संमतीनं लग्न केलं. रुबिनानं धर्मांतरही केलं. विशेष म्हणजे प्रेमपालच्या कुटुंबानं रुबिनाचा स्वीकार केला. शोएबकडून सातत्यानं जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचं पुष्पादेवीनं सांगितलं. आम्हाला सुरक्षा देण्यात यावी. अन्यथा शोएब आमच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करेल, असं पुष्पादेवी म्हणाली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.