रागावल्यामुळे तुम्हाला कोणतीच मदत होत नाही. रागामुळे परिस्थिती सुधारत नाही. तुम्हाला स्टेडियममध्ये आलेले ४० हजार जण पाहत असतात. कोट्यवधी प्रेक्षक टीव्हीच्या माध्यमातून तुमचा खेळ बघत असतात. अशा परिस्थितीत क्षेत्ररक्षणात चूक झाल्यास त्यामागच्या कारणाचा मी शोध घेतो, असं धोनीनं सांगितलं.
एखादा खेळाडू त्याचे १०० टक्के देत असेल आणि तरीही त्याच्याकडून झेल सुटल्यास मला काहीच अडचण नसते. त्याचवेळी मी त्यानं सरावादरम्यान किती झेल घेतले याचा विचार करतो. त्या खेळाडूला एखादी समस्या असल्यास ती सोडवण्यासाठी तो किती प्रयत्न करतो याचा विचार करतो. एका सुटलेल्या झेलाकडे न पाहता मी या सगळ्याचा साकल्यानं विचार करून बघतो. त्या दिवशी कदाचित त्या चुकीमुळे आम्ही सामनादेखील गमावलेला असेल, पण त्या खेळाडूच्या मनस्थितीचा मी विचार करतो, अशा शब्दांत धोनीनं त्याच्या शांत आणि संयमीपणामागचं गुपित सांगितलं.
Home Maharashtra ms dhoni, कोणत्याही परिस्थितीत धोनी शांत कसा राहतो? ‘कॅप्टन कूल’नं सोप्या शब्दांत...
ms dhoni, कोणत्याही परिस्थितीत धोनी शांत कसा राहतो? ‘कॅप्टन कूल’नं सोप्या शब्दांत सांगितलं गुपित – ms dhoni reveals how he controlled anger on field and became captain cool
मुंबई: गेल्या काही दिवसांत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा नेतृत्त्व करताना दडपणाखाली दिसला. संघ अडचणीत असताना रोहितवर असलेला तणाव स्पष्ट दिसत होता. खेळाडूंकडून चुका झाल्यावर रोहित त्यांच्यावर ओरडताना दिसला. त्याला रागावर नियंत्रणात ठेवता येत नव्हतं. त्यावेळी अनेकांना कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीची आठवण आली. परिस्थिती कशीही असो, दडपण कितीही असो धोनी कायम शांत असायचा. यामागचं नेमकं गुपित दस्तुरखुद्द धोनीनं सांगितलं आहे.