या ऑनलाईन फ्रॉड कंपनीच्या बाबत स्थानिक पोलिसांना फोन केला किंवा कामास नकार दिला तर तरुणांचा अमानुष छळ करत, अमानुषपणे मारहाण करत, विदयुत करंट देत, अवयव काढणाऱ्या टोळी विकत. दिवसाला हि कंपनी १० कोटी पेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन पध्दतीने लुटतात केवळ तेथील सरकारचे अप्रत्यक्ष सहकार्य असल्यामुळे असंख्य टोळी तेथे सक्रिय आहेत.
शादी डॉटकॉम, जीवनसाथी डॉटकॉम, या विवाह सूचक संकेत स्थळावरिल मुलींचे सुंदर फोटो घ्यायचे आणि मुलींच्या नावे प्रोफाईल बनवायचे आणि भारतातील तसेच युएस, युक्रेन, व्हियतनाम आदी येथील श्रीमंत मुलांना संपर्क करायचा आणि जवळीक करायची. एकाच वेळी वेगवेगळ्या नंबर वरुन २०० ते ३०० तरुणांना संपर्क केला जातो. सुंदर मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरुन डाऊनलोड करुन घ्यायचे ते फोटो प्रोफाईलवर जोडायचे. भारतीयांसोबत चॅटींग करायची. असं काम तिथे चालतं.
८ दिवसांच्या भयंकर अनुभवानंतर सुदैवाने कबीर आणि इतर सात भारतीयांची सुटका झाली आहे. कबीर शेखच्या लक्षता आले की आपण फसलोय तेव्हा त्याने तेथील भारतीय दुतावासाला संपर्क केला. दोन तासानंतर स्थानिक पोलीस आणि दुतावासाचे अधिकारी यांनी कबीर सह ६ भारतीय तरुणांना सोडवलं आणि भारतात पाठवलं. कबीर शेख हा ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर या काळात कंबोडिया या देशात होता.
अजूनही १५ भारतीय मुले-मुली कंबोडियात अडकली आहेत. भयंकर यातना सहन करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तरुणांना फसवणारे काही एजंट बिहार, बंगालमध्ये काम करत आहेत. कंबोडियातूनही मुलांना फसवून भारतात आणून त्यांच्याकडून हेच काम इथे करुन घेतलं जात आहे.