मुंबई: सत्ता स्थापनेनंतर अखेर जवळपास तीन महिन्यांनी शिंदे सरकारनं पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला ४० दिवस लागले होते. तर पालकमंत्र्यांच्या घोषणेला ९६ दिवस लागले. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणेच पालकमंत्र्यांच्या घोषणेतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ताकद दिसून आली आहे. फडणवीस यांच्याकडे एकूण सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. सरकारमधील इतर कोणत्याच मंत्र्याला दोनपेक्षा अधिक जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाही.

देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. इथूनच ते विधानसभेवर निवडून जातात. त्यामुळे त्यांच्याकडे नागपूर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं आहे. त्यासोबतच त्यांच्याकडे वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. विदर्भातील चार आणि मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे देण्यात आलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे पालकमंत्री जाहीर, केसरकरांना मुंबईची लॉटरी, ठाणे-औरंगाबाद कोणाकडे?
मंत्रिमंडळ वाटपातही देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा दिसून आला होता. गृह, अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण अशी महत्त्वाची मंत्रिपदं फडणवीसांनी घेतली. विशेष म्हणजे ही सगळी मंत्रिपदं महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मंत्रिमंडळ वाटपानंतर आता पालकमंत्रिपद वाटपातही फडणवीसांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
नवरीनं माहेर सोडावं तसं उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला….संदिपान भुमरेंचं अमरावतीत टीकास्त्र
इतर पालकमंत्र्यांची नावे पुढीलप्रमाणे:

राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर,
सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया,
चंद्रकांत दादा पाटील- पुणे, विजयकुमार गावित- नंदुरबार,
गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड,
गुलाबराव पाटील – बुलढाणा, दादा भुसे- नाशिक,
संजय राठोड- यवतमाळ, वाशिम,
सुरेश खाडे- सांगली,
संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
उदय सामंत- रत्नागिरी, रायगड, तानाजी सावंत-परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)
रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
अब्दुल सत्तार- हिंगोली,
दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर,
अतुल सावे – जालना, बीड, शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here