देहरादून: खासगी रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारीच्या हत्येमुळे उत्तराखंडमध्ये संतापाची लाट आहे. रिसॉर्टचा मालक पुल्कित आर्यासह तिघांना अंकिताच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी हत्येची कबुली दिली आहे. पुल्कित आर्य हा भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. पुल्कितला अटक होताच भाजपनं विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांचं रिसॉर्टदेखील तोडण्यात आलं.

अंकिता भंडारीची अनेक स्वप्नं होती. खांद्यावर जबाबदाऱ्या होत्या. याच जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी तिनं नोकरी करण्यास सुरुवात केली. अंकिता पाच दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह आज चिल्ला कालव्यात सापडला. अंकिताच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. पौंडीमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंकिताची हत्येमुळे उत्तराखंडमधील वातावरण तापलं आहे.
रिसेप्शनिस्ट रिसॉर्टच्या कस्टमरकडे जाईना; भाजप नेत्याच्या मुलानं निर्घृणपणे संपवलं
अंकिता १८ सप्टेंबरला पुल्कित आर्य आणि इतर दोन जणांसह ऋषिकेशला गेली होती. हे सगळेजण त्याच रात्री रिसॉर्टमध्ये परतणं अपेक्षित होतं. मात्र अंकिता परतली नाही. अंकितानं शेवटचा कॉल रिसॉर्टच्या शेफला केला. ‘अंकितानं फोनवर रडत होती. माझी बॅग घेऊन या. ती रस्त्यावर ठेवून द्या, असं अंकितानं सांगितलं. स्टाफ अंकिताची बॅग घेऊन गेला. मात्र त्याला अंकिता दिसली नाही,’ असं शेफनं सांगितलं.
रिसॉर्ट रिसेप्शनिस्टचा मृत्यू; पोलिसांना वेगळाच संशय, भाजप नेत्याच्या मुलाला अटक
अंकिता शेवटची १८ सप्टेंबरला ३ च्या आसपास दिसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘अंकितासह ४ जण रिसॉर्टहून निघाले होते. मात्र रात्री ९ वाजता केवळ तीनच जण परत आले. मात्र जेवण ४ जणांचं मागवण्यात आलं होतं. त्या तिघांनी रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला,’ असं पोलिसांनी सांगितलं. अंकिताच्या कुटुंबात आई, वडील आणि एक भाऊ आहे. आई अंगणवाडीत काम करते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here