मुंबई : बेस्ट उपक्रमाने नवरात्रोत्सवानिमित्त प्रवाशांसाठी विशेष सवलत जाहीर केली असून, ‘चलो अॅप’वर १९ रुपयांच्या तिकिटावर नऊ बसफेऱ्यांची मुभा असणार आहे. ही विशेष सुविधा २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. त्याअंतर्गत १९ रुपयांच्या तिकिटावर नऊ दिवसांत कधीही १० बसफेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, वातानुकूलित, विनावातानुकूलित बस, हो हो बस तसेच विमान प्रवाशांसाठी चालवण्यात येणाऱ्या बसने या तिकिटावर प्रवास करता येऊ शकेल.