गडचिरोली : रेव्हेन्यू कॉलनीतील ३४ वर्षीय कुमोद लाटकर या युवकाचा मंगळवार २० सप्टेंबर रोजी आठवडी बाजाराजवळ असलेल्या तलावात मृतदेह आढळला होता. मृतक कुमोदला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचे निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने २३ सप्टेंबर रोजी या प्रकरणातील दोन आरोपींना अटक केली आहे.

रोशन पवनसिंग ठाकूर (वय ३५) आणि अमोल नामदेव दडमल (वय २५) दोघेही राहणार चनकाई नगर, गडचिरोली अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत तर निलेश मारकवार हा आरोपी फरार आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तिघंही आरोपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारु पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या पार्टीत कुमोद व रोशन यांच्यामध्ये भांडण झाले या भांडणादरम्यान रोशनने लोखंडी रॉडने कुमोदच्या डोक्यावर जबर प्रहार केला. यात कुमोद जागीच मृत्यू झाला. तो मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याला तलावाच्या पाण्यात ढकलून दिले.

तिसऱ्या टी-२० मध्ये रोहित पुन्हा बदलणार संघ! या दोन खेळाडूंना मिळणार डच्चू
२० सप्टेंबर मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, शवविच्छेदनादरम्यान त्याच्या डोक्यावर वार आढळून आले. त्यामुळे त्याची हत्याच झाल्याचे स्पष्ट झाले. यातील दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपी रोशन ठाकूर हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे त्याच्यावर चोरीचे तीन दारु विक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. रोशन एका चोरीच्या गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. तो नुकताच जामीनावर सुटून आला होता. या दरम्यान तो व कुमोद दोघेही चोरी करायचे. अशी कबुली रोशनने दिली आहे. चोरीच्या पैशाच्या वादातून त्याने हत्या केल्याचा अंदाज आहे. दारुच्या नशेत आपण कुमोदची हत्या केल्याचे रोशन पोलिसांना सांगत आहे. मात्र, पोलिसांचा त्याच्या बोलण्यावर विश्वास नाही. कारण तलावाच्या पाळीवर लोखंडी रॉड आला कुठून, असा प्रश्न आहे. पोलिसांना पूर्वनियोजित कट रचून हत्या केल्याचा अंदाज आहे.

रात्रीची घटना असल्याने आरोपींचा शोध घेणे अतिशय कठीण काम होते. गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम गोरे, पोलीस उपनिरीक्षक संघमित्रा खोब्रागडे, स्नेहल चव्हाण, चेतनसिंह चव्हाण यांनी गोपनीय माहिती काढत आरोपींना अटक केली.
शिंदे गटातील मंत्र्याचा खडसेंना खोचक टोला, ‘… अमित शहा यांना कशाला भेटायला जातात’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here