रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळील आरटीओ रेल्वे पुलावर रेल्वे गाडीपुढे स्वतःला झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रणव कृष्णा सनगरे (वय २४, रा. टिके भातडेवाडी) असं मृत तरुणाचं नाव आहे.

तरुणाने आत्महत्या केल्याची बाब लक्षात येताच रेल्वे ट्रॅकमॅनने तात्काळ ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर शहर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. धक्कादायक म्हणजे प्रणव याचे मे महिन्यातच लग्न झाले होते. त्यांचा प्रेमविवाह झाला होता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

मोठी बातमी : अमरावतीत बालकांच्या ICUमध्ये अचानक लागली आग; तातडीने दुसऱ्या वॉर्डात हलवले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी प्रणव हा आरटीओ रेल्वे पुलावर गेला होता. यावेळी प्रणव याने कोच्चिवली भावनगर एक्स्प्रेस गाडीसमोर स्वतःला झोकून दिले. कुवारबाव रेल्वे ट्रॅकजवळ हा मृतदेह आढळला. रेल्वेच्या धडकेत प्रणव याचा जागीच मृत्यू झाला. कोकण रेल्वेचे ट्रॅकमन यांना सायंकाळी प्रणव याचा छिन्न-विछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. त्यानुसार त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, प्रणव सनगरे याने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या का केली, हे अद्याप समजू शकलेलं नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गायकवाड करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here