Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 25, 2022, 1:36 PM

Parbhani Maharashtra news | ही घटना परभणीच्या राणीसावरगाव येथे शनिवार २४ सप्टेंबर रोजी घडली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिला प्रवासी आणि महिला वाहक राणीसावरगाव येथील पोलीस चौकीमध्ये गेल्या होत्या. मात्र दोन्ही महिला या एकमेकांच्या ओळखीच्या निघाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही महिलांकडून आम्ही गुन्हा दाखल करणार नसल्याचे लेखी लिहून घेतले असल्याचे देखील वृत्त आहे.

 

Parbhani ST
एसटी बसमध्ये हाणामारी

हायलाइट्स:

  • गंगाखेड आगारातून अहमदपूरकडे जाणाऱ्या बसमधील घटना
  • पुढच्या स्टॉपवर गाडी थांबवून आपल्या उतरून देण्याची मागणी
परभणी: पुढच्या स्टॉप वर उतरण्यावरून झालेल्या वादामध्ये महिला वाहक आणि महिला प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना परभणीत घडली आहे. या प्रकरणाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये महिला वाहक महिला प्रवासाच्या केसाला धरून ओढत असल्याचे दिसून येत आहे. ही घटना परभणीच्या राणीसावरगाव येथे घडली आहे. दरम्यान या प्रकरणी कोणीही तक्रार दिली नसल्याने पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

गंगाखेड आगारातून अहमदपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये एक महिना प्रवासी बसली होती. सदरील महिला गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील बस स्थानकावर उतरली नाही. या महिलेने पुढच्या स्टॉपवर गाडी थांबवून आपल्या उतरून द्यावे, अशी मागणी महिला वाहकाकडे केली. त्यावरुन महिला वाहक आणि सदर महिला प्रवाशात लाथाबुक्क्याने तुंबळ हाणामारी झाली.त्यानंतर गाडी स्टॉप वर थांबवली असता महिला वाहकाने महिला प्रवाशाचे केस धरून ओढत असल्याचा व्हिडिओ काही लोकांनी करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

नाशकात टोल भरण्यावरून वाद, दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी

ही घटना परभणीच्या राणीसावरगाव येथे शनिवार २४ सप्टेंबर रोजी घडली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिला प्रवासी आणि महिला वाहक राणीसावरगाव येथील पोलीस चौकीमध्ये गेल्या होत्या. मात्र दोन्ही महिला या एकमेकांच्या ओळखीच्या निघाल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही महिलांकडून आम्ही गुन्हा दाखल करणार नसल्याचे लेखी लिहून घेतले असल्याचे देखील वृत्त आहे. या प्रकाराची चर्चा गंगाखेड तालुक्यामध्ये होत आहे. तर जखमी झालेल्या महिला प्रवाशाला राणीसावरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी महिला प्रवाशांनी आपल्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here