मुंबई: बॉलिवूड गायिका नेहा कक्कर सध्या चर्चेत आहे. तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येतंय. तिनं अनेक जुन्या गाणी तिच्या अंदाजात गायली आहेत. काही गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळाय, तर काही गाणी प्रेक्षकांना आवडली नाहीत. पण आता तर एका गाजलेल्या गाण्याचा तिनं रिमेक केलाय. पण हा प्रयत्न मात्र फसल्याचं दिसून आलंय. प्रेक्षक आणि नेटकऱ्यांनी नेहावर असं न करण्याचा सल्ला दिलाय.
ऑस्करवर नाव कोरणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं धक्कादायक निधन; झोपेतच मृत्यूने गाठलं
नवरात्रोत्सव जवळ आला की दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकचं नाव चर्चेत येतं. पण सध्या तिनं नेहा कक्करवर निशाणा साधलाय. मैने पायल है छनकाई हे गाण म्हणजे फाल्गुनी यांची ओळख. नेहानं याच गाण्याचं रिमेक लॉन्च केलंय. पण हे रिमेक व्हर्जन पाहून फाल्गुनीच्या चाहते भडकले आहेत. त्यांनी नेहला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. फाल्गुनी यांनीही कडक शब्दांत नेहाला सुनावलं आहे.

नेहावर टीका होण, ट्रोलिंग होणं ही नवी गोष्ट नाही. यापूर्वी अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलंय. कधी ब्रेकअप तर, कधी छोट्या छोट्या गोष्टींवर रडण, ब्रेकअप, प्रमोशनसाठी गरदोर असल्याचा खोटा फोटो शेअर करणं…ही यादी मोठी आहे.हे सगळं असलं तरी नेहाचा संघर्ष नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. जेव्हा जेव्हा नेहा चर्चेत येते, तेव्हा तेव्हा तिच्या स्ट्रगलबद्दल बोललं जातं.
जंगलात वाघ एकच असतो… अमेयने थेट सुमित राघवनला दिली तंबी, असं नेमकं काय घडलं?
नेहाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नेहा आणि तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरण कार्यक्रमांमध्ये भजन गायच्या. यासाठी तिला केवळ तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर ती ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिथूनच तिचा हा यशाचा प्रवास सुरू झाला. तिनं नंतर मागं वळून पाहिलं नाही.

नेहानं दोन तिनं वर्षांपूर्वी ऋषिकेशमध्ये एक अलिशान असा बंगला खरेदी केला आहे. पण याच शहरात कधीकाळी ती आणि तिचं कुटुंब एका भाड्याच्या खोलीत राहायचं. एका छोट्याशा खोलीत एका टेबलवर तिची आई स्वयंपाक करायची. आता त्याच शहरात स्वत:चा बंगला खरेदी केल्यानंतर नेहा भावूक झाली होती.

ज्या रिेअॅलिटीशोमध्ये नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती,त्या शोमध्ये ती आता परिक्षकाच्या खुर्चीत असते. त्यामुळं तिला कितीही ट्रोल केलं तरी, तिचा हा प्रवास कुणीही नाकारू शतक नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here