पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप रंगनाथ कदम (वय ५१, रा. माळीगल्ली, वडाळागाव, नाशिक) असे मृताचे नाव आहे. मृत दिलीप हे पंचवटीतील गणेशवाडीत गॅरेज मॅकेनिक असून ते वडाळा गावातील माळीगल्लीत वास्तव्यास होते बायको लक्ष्मी दिलीप कदम व दिलीप यांच्यात घरगुती वाद झाले. त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले त्यात संशयित आरोपी लक्ष्मी हिने आपल्या नवऱ्याचे हात पाय काही साथीदारांच्या मदतीने बांधून ठेवले व नंतर पतीच्या डोक्यात व पोटात टोकदार शस्त्राने वार करून हत्या केली. हत्येनंतर नवऱ्याचा मृतदेह घरातील पलंगाखाली लपवून ठेवला व नंतर घराला कुलूप लावून संशयित आरोपी लक्ष्मी फरार झाली आहे.
शनिवारी दिलीप यांच्या घरातून उग्र वास येत होता. ही माहिती स्थानिकांकडून पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन त्यानंतर घराची पाहणी करताच दिलीप यांचा मृतदेह दोरीने बांधून बाहेर काढल्यानंतर पोटावार वार केलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, दिलीप यांची लक्ष्मी ही दुसरी पत्नी असल्याची देखील माहिती मिळाली आहे. साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून मृताचा मुलगा रोशन दिलीप कदम याने दिलेल्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संस्थेत आरोपी असलेल्या दिलीपच्या पत्नीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.