Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 25, 2022, 3:48 PM

Maharashtra Politics : युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी शिंदे गटाला आणि तानाजी सावंतांना इशारा दिला आहे. उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू असा इशारा कोळी यांनी दिला आहे.

 

Maharashtra Politics
उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू; शरद कोळींचा तानाजी सावंतावर पलटवार

हायलाइट्स:

  • उद्धव ठाकरेंना ठणकावणाऱ्यांना ठेचून काढू
  • शरद कोळींचा तानाजी सावंतावर पलटवार
  • सावंत यांनी ठाकरेंवर एका भाषणात टीकास्त्र सोडले होते
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील एका कार्यक्रमादरम्यान भाषण केले. यावेळी नामदार तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगतो, गद्दारी तुम्ही केली, दिल्लीला गेले असते तर सत्ता टिकली असती, अशा भाषेत टीकास्त्र केले होते. यावर युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना प्रतिउत्तर दिलं आहे. “उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगणाऱ्यांना ठेचून काढू”, असा इशारा शरद कोळी यांनी शिंदे गटाला व तानाजी सावंताना दिला आहे. ( Sharad Koli counter attack on Tanaji Sawant)

सत्तेचा माज अधिक काळ राहत नाही

शिंदे गटातील मंत्र्यांनी व पदाधिकाऱ्यांनी तोंड सांभाळून बोलावे. सत्ता कायमची नसते, सत्ता येते आणि जाते. पण उद्धव ठाकरेंबाबत एकही अपशब्द काढू नये असा इशारा शरद कोळी यांनी दिला. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद येथील भाषणात उद्धव ठाकरे यांवर टीकास्त्र सोडले होते.

Nashik : नाशिकमधील DRDOच्या परिसरात ड्रोन उडवल्याने खळबळ, महिन्यातील दुसरी घटना
शिवाजी महाराज कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत

उद्धव ठाकरे अगर दिल्लीत गेले असते तर सत्ता वाचली असती असे तानाजी सावंत यांनी म्हंटले होते. त्यावर शरद कोळींनी शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले. शिवाजी महाराजांनी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. शिवाजी महाराजांना मुघलांकडून अनेकदा बोलावणे आलं होतं. पण शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी त्यांनी कधीच दिल्ली समोर झुकले नाहीत. उद्धव ठाकरे देखील झुकणार नाही, असं शरद कोळी यांनी ठणकावून इशारा दिला आहे.

गुंतवणूकदारांनो तयार राहा; सोमवारपासून आहे कमाईची संधी, जाणून घ्या A टू Z माहिती

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here