कोइंम्बतूर : पश्चिम विभागाने आज रविवारी दक्षिण विभागाचा पराभव करुन १९व्यांदा दुलीप करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मात्र, या सामन्यादरम्यान कर्णधाराच्या काटेकोरपणाचे कौतुक होत असले तरी अनुशासनहीनतेमुळे खेळाडूला टीकेला सामोरे जावे लागत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. ते म्हणजे पश्चिम विभागाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल यांच्याबद्दल.

अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठा निर्णय घेत यशस्वी जैस्वालला मैदानाबाहेर काढले. प्रत्यक्षात असे घडले की यशस्वी जैस्वाल आणि दक्षिण विभागाचा फलंदाज रवी तेजा यांच्यात सतत स्लेजिंग होत होती. तेजा इतका नाराज झाला की त्याने जैस्वाल याच्याबद्दल पंचांकडे तक्रार केली. या प्रकरणात अंपायरने कर्णधार अजिंक्य रहाणेने मध्ये पडला.

मुख्यमंत्र्यांचा भाजपला धक्का; परभणीत ध्वजारोहण भाजपच्या मंत्र्यांच्या हस्ते, मात्र पालकमंत्रिपदी तानाजी सावंत
अजिंक्य रहाणेने यशस्वी जैस्वालला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण रवी तेजाने काही बोलताच तो पुन्हा भडकला आणि कर्णधारासमोर काहीतरी बोलू लागला. रहाणेला जैस्वालचे वागणे अजिबात आवडले नाही. त्याने रागाने जैस्वालला क्षेत्ररक्षणाबाबत वाईट वृत्ती दाखवत मैदानाबाहेर पाठवले. रहाणे आणि जैस्वालच्या या दृश्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. चाहते कर्णधाराचे कौतुक करत असतानाच यशस्वी जैस्वालला यातून धडा मिळेल, असंही म्हणत आहेत.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, आज झालेल्या अंतिम सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी पश्चिम विभागाने दक्षिण विभागाचा २९४ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. पश्चिम विभागाने पहिल्या डावात २७० धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण विभागाचा पहिला डाव ३२७ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या जोरावर दक्षिण विभागाला ५७ धावांची आघाडी मिळाली.

यशस्वी जैस्वाल (२६५) आणि सर्फराज खान (१२७*) यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर पश्चिम विभागाने पुन्हा शानदार पुनरागमन केले आणि ५८५/४ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे दक्षिण विभागाला ५२९ धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग करताना संपूर्ण संघ ७१.२ षटकांत २३४ धावांत गारद झाला. पश्चिम विभागाने यासह इतिहास रचला आणि दुलीप ट्रॉफीचे सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ बनला आहे. पश्चिम विभागाने १९व्यांदा दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आणि १८ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या उत्तर विभागाला मागे टाकले.

दिल्लीसमोर शिवसेना कधीही मुजरा करणार नाही, शरद कोळींचा तानाजी सावंतांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here