Jalana News : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील प्रल्हादपूर गावात एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात गांजाची झाडे लावली होती. मात्र, पोलिसांना कोणी तरी खबर दिली आणि सर्व प्लॅन फिसकटला. पोलिसांनी या शेतकऱ्याला अटक केली आहे.

हायलाइट्स:
- मक्याच्या शेतात गांजांची झाडे
- पोलिसांमुळे सर्व प्लॅन फिसकटला
- जालन्यातील प्रल्हादपूर तालुक्यातील घटना
प्रल्हादपूरमध्ये एका शेतकऱ्याने मक्याच्या पिकातच गांजाची झाडे लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही धक्कादायक माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने सदरील शेतकऱ्याच्या शेतात जाऊन धाड टाकली असता अंदाजे लाख भर किंमत असलेल्या २१ किलो गांजाची झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांच्या पथकाने ही झाडे जप्त करून आरोपीला अटक केली. दगडूबा धोंडूबा खेकाळे असं या शेतकऱ्याचं नाव असून शेतात मक्याचे पीक घेत असताना त्यांनी अवैधरीत्या गांजाच्या झाडांची लागवड केली होती.
मक्याचे पीक सध्या चांगलेच बहरत आलेले असल्याने गांजाची झाडे ओळखू येणार नाही असे त्यांना वाटले, पण कुणीतरी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असल्याने या शेतकऱ्याचे गांजा लागवडीचे पितळ उघडे पडले आहे. भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, विभागीय पोलीस अधिकारी बहुरे यांच्या पथकांनी प्रल्हादपूर गावातील गट क्रमांक ५१ मध्ये छापा टाकला. शेताच्या बांधावर गांजाची रोपे लावलेली पोलिसांना आढळली. पोलिसांनी ही रोपे नष्ट करून शेतमालक दगदूबा धोंडूबा खेकाळेला अटक केली. आरोपी विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
देशातील दोन बड्या उद्योगपतींच्या ठाकरे-शिंदेंसोबत भेटीगाठी
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.