दीप्तीने केलेले ‘मंकडिंग’ आता वादात सापडले आहे. क्रिकेटचे दिग्गज दोन गटात विभागले गेले आहेत. काही क्रिकेटर नियमाचा हवाला देऊन हे बरोबर असल्याचं सांगत आहे, तर दुसरीकडे हे कृत्य ‘स्पिरिट ऑफ गेम’च्या विरोधात आहे, असं सांगत आहेत. विशेषत: इंग्लंडचे क्रिकेटपटू आणि माजी क्रिकेटपटू दीप्ती शर्माच्या कृतीवर नाखूष आहेत आणि त्याला ‘स्पिरिट ऑफ गेम’च्या विरोधात आहे, असं म्हणत आहेत.
देशातील दोन बड्या उद्योगपतींच्या ठाकरे-शिंदेंसोबत भेटीगाठी
पण इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सने दीप्तीच्या समर्थनार्थ ट्वीट करून इंग्लिश क्रिकेटरांची बोलती बंद केली आहे. हेल्सने ट्वीट करून दीप्तीने केलेल्या धावबादला एक प्रकारे समर्थन दिलं आहे. हेल्सने ट्विट करून लिहिलं आहे की, “बॉल हातातून जाईपर्यंत नॉन स्ट्रायकरला क्रीजवर राहणे अवघड नसावे.’
इंग्लंड बॅटरचे हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे आणि बरेच लोक याच्याशी सहमत आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की जर गोलंदाजाने त्याच्या बॉलिंग लाईनच्या आत राहून गोलंदाजी करायची असेल, तर फलंदाजांनीही चेंडू गोलंदाजाच्या हाताबाहेर जाईपर्यंत क्रीजमध्येच राहावे.
इंग्लंडच्या डावाच्या ४४व्या षटकात गोलंदाज दीप्ती शर्माने चेंडू टाकण्यापूर्वी इंग्लंडचा फलंदाज चार्ली डीन क्रिझमधून बाहेर पडली, त्यानंतर दीप्तीने नॉन-स्ट्रायकिंग एंडला चेंडू मारला, ज्यामुळे चार्ली डीन धावबाद झाली. त्यानंतर तिला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले आणि भारताने हा सामना १६ धावांनी जिंकला आणि अशा प्रकारे भारताने इंग्लंडचा सूपडा साफ केला.