नाविक व खलाशांनो इराणला जाताना सावध राहा, असा इशारा खलाशांच्या संघटनेने दिला आहे. तेथे खलाशांना वेतन न देता पकडून ठेवले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे.

लिबियात अडकलेला खलाशी परतला
लिबियामध्ये अडकलेला खलाशी मायदेशात सुखरूप परतला आहे. रोशन राज असे त्याचे नाव आहे. ‘द मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया’ने (एमयूआय) रोशनला परत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जहाजाच्या मालकाने आर्थिक कारणांमुळे मालवाहू जहाज सोडून दिल्याने रोशन राज लिबियातील मिसराता बंदरात जहाजात १९ जानेवारी २०२२पासून अडकला होता. तेव्हापासून रोशनला मालकाने वेतनदेखील दिलेले नाही. ‘या काळात रोशनला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. त्याला परत आणण्यासाठी शिपिंग महासंचालकांसह भारतीय दूतावास, ट्युनिसमधील चान्सरी प्रमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला. ट्युनिशिया हा लिबियाचा शेजारी देश आहे. त्यांनी मदत केली’, असे ‘एमयूआय’चे कॅप्टन तुषार प्रधान यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.