Maharashtra Politics | बांगर यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक त्यांच्या गाडीला आडवा आला. शिवसैनिक पुढं आल्याने बांगर यांच्या गाडीच्या चालकांनं गाडीचा वेग कमी केला. नेमक्या याचवेळी इतर शिवसैनिक बांगरांच्या गाडीजवळ जमले. बांगर बसलेल्या ठिकाणी गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी हाताने जोरात फटके मारले. मात्र, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी पुढे नेली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हायलाइट्स:
- संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत
- शिंदे गटात सर्वात शेवटी सहभागी झालेले आमदार आहेत
संतोष बांगर रविवारी अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आले होते. यावेळी शिवसैनिकांकडून रस्त्यात संतोष बांगर यांच्या गाड्यांचा ताफा अडवून हल्ला करण्यात आला. बांगर यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी पुढे जाताच एक शिवसैनिक त्यांच्या गाडीला आडवा आला. शिवसैनिक पुढं आल्याने बांगर यांच्या गाडीच्या चालकांनं गाडीचा वेग कमी केला. नेमक्या याचवेळी इतर शिवसैनिक बांगरांच्या गाडीजवळ जमले. बांगर बसलेल्या ठिकाणी गाडीच्या काचेवर शिवसैनिकांनी हाताने जोरात फटके मारले. मात्र, गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत गाडी पुढे नेली होती. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
कोण आहेत संतोष बांगर?
संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. ते शिंदे गटात सर्वात शेवटी सहभागी झालेले आमदार आहेत. सुरुवातीच्या काळात संतोष बांगर यांनी शिंदे गटातील आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी शिंदे गटावर प्रचंड टीका केली होती. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीमध्ये असताना संतोष बांगर यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. उद्धव ठाकरेंसाठी भरसभेत त्यांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले होते. पण विशेष अधिवेशनादरम्यान विश्वादर्शक ठरावाच्या दिवशी संतोष बांगर शिवसेनेची साथ सोडून अचानक शिंदे गटाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे हिंगोलीतील शिवसैनिकांच्या मनात संतोष बांगर यांच्याविषयी प्रचंड रोष आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.