मुंबई : भारतीय शेअर बाजारात आजही नकारात्मक संकेत कायम आहेत आणि देशांतर्गत बाजार आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी मोठ्या कमजोरीसह उघडले. आज, प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्समध्ये शेअर बाजारात ७०० हून अधिक अंकांची घसरण झाली आणि सेन्सेक्स-निफ्टी १-१ टक्क्यांहून अधिक घसरत व्यवहार करत होते. आज सर्व आशियाई बाजार लाल चिन्हात व्यवहार करत होते. शांघाय, निक्केई, हँग सेंग आणि स्ट्रेट टाइम्समध्ये व्यापार मंद राहिला.

भारतीय बाजाराची सुरुवात
आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ५७३.८९ अंकांच्या किंवा ०.९९ टक्क्यांच्या घसरणीसह ५७,५२५ वर उघडला. तसेच एनएसई निफ्टी १७१.०५ अंकांनी किंवा ०.९९ टक्क्यांच्या घसरणीसह १७,१५६ वर उघडला आहे.

बाजार सुरू आधी जाणून घ्या आज कोणते शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर
परदेशी बाजाराची स्थिती काय?
जागतिक बाजारपेठेत सध्या प्रचंड गोंधळ आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यापासून गुंतवणूकदार अमेरिकन शेअर बाजारापासून दूर राहत आहेत. तिथे सातत्याने घसरण होताना दिसत आहे. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी अमेरिकन बाजार घसरले असून यूएस बाजार शुक्रवारी प्रचंड अस्थिरतेच्या दरम्यान २.५% ने घसरले. डाऊ जोन्स जवळपास ५०० अंकांनी घसरून २२ महिन्यांच्या नीचांकी २९,५९० वर बंद झाला. दुसरीकडे, Nasdaq २०० अंकांनी तुटून १०,८६८च्या पातळीवर बंद झाला.

अमेरिकेच्या पार्श्वभूमीवर युरोपीय बाजारही शेवटच्या ट्रेडिंग सत्रात मोठ्या घसरणीने बंद झाले. दुसरीकडे, आशियाई बाजाराबद्दल बोलायचे झाले तर येथेही घसरण दिसत आहे. SGX निफ्टी सुमारे १८० अंकांनी घसरला तर डाऊ फ्युचर्समध्येही सुमारे १७० अंकांची मोठी घसरण आहे.

टाटा समूहाच्या शेअरचे छप्परफॅड रिटर्न, गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना दिलाय मजबूत परतावा
कोणते शेअर्स फायद्यात
आज HUL, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस, नेस्ले आणि भारती एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सेन्सेक्सच्या चढाईत वाढ होताना दिसत आहे. HUL १.४१ टक्क्यांनी आणि बजाज फिनसर्व्ह ०.७० टक्क्यांनी वर आहे.

गुंतवणूकदारांनो तयार राहा; सोमवारपासून आहे कमाईची संधी, जाणून घ्या A टू Z माहिती
आज कोणते शेअर्स घसरले
आज सेन्सेक्सच्या घसरलेल्या समभागांवर नजर टाकले तर सन फार्मा, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, डॉ रेड्डीज लॅब्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी बँक, L&T, टायटन, एसबीआय, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, विप्रो, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, टाटा स्टील, M&M आणि पॉवरग्रिड या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत आहे.

आशियाई बाजारातही मंदी
आशियातील बहुतांश शेअर बाजार आज सकाळी तोट्यात उघडले आणि लाल चिन्हावर व्यवहार करत आहेत. आज सकाळी सिंगापूर स्टॉक एक्स्चेंजमध्ये ०.९२ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे, तर जपानचा निक्केई २.२१ टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. तसेच हाँगकाँगच्या शेअर बाजारातही १.१८ टक्के आणि तैवानच्या बाजारात १.१६ टक्क्यांची घसरण दिसून येत आहे. याशिवाय दक्षिण कोरियाचा कोस्पी बाजारही २.३० टक्क्यांच्या घसरणीने व्यवहार करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here