Airbags in car | या कारमधून चार प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कारचं बोनेट, दरवाजा यांना जबर फटका बसून मोठं नुकसान झालं. एअरबॅग जर वेळीच उघडल्या नसत्या तर या कारमधील चारही जणांचं काय झालं असतं, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती. या अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून कारमधील प्रवासीही हादरुन गेले होते.

हायलाइट्स:
- काळ आला होता पण वेळ आली नव्हती
- वाहन थेट दुभाजकावर जाऊन धडकले
प्राथमिक माहितीनुसार, पुणे – सातारा महामार्गावर असणाऱ्या शिंदेवाडी गावाजवळ सकाळच्या सुमारास पाऊस येत होता त्यामुळे कारचालकला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे वाहन थेट दुभाजकावर जाऊन धडकले. दोन पलटी खाऊन ती कार थेट दुसऱ्या लेन्समध्ये जाऊन उभी राहिली. तिथे कुठलेही वाहन येत नसल्याने मोठा अपघात टळला आहे. परंतु ही धडक इतकी जोरदार होती की, कारच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.मात्र, गाडीतील एअर बॅग योग्यवेळी उघडल्याने प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.
या कारमधून चार प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात कारचं बोनेट, दरवाजा यांना जबर फटका बसून मोठं नुकसान झालं. एअरबॅग जर वेळीच उघडल्या नसत्या तर या कारमधील चारही जणांचं काय झालं असतं, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी होती. या अपघातानंतर कारची झालेली अवस्था पाहून कारमधील प्रवासीही हादरुन गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले.सातारा महामार्गावर काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती.वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांकडून ती अपघातग्रस्त कारा बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
नितीन गडकरींनी कार कंपन्यांना फटकारले
टाटा सन्सचे माजी संचालक आणि ख्यातनाम उद्योगपती सायरस मिस्त्रींचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता त्यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात उपलब्ध असणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. एअरबॅग्जची संख्या वाढवल्यावर इकॉनॉमी कारची किंमत वाढते, असा युक्तिवाद कंपन्यांकडून केला जातो. मात्र त्यामध्ये तथ्य नाही. एक एअरबॅग वाढवल्यानं कारची किंमत केवळ ९०० रुपयांनी वाढते, असं गडकरी म्हणाले. कारमध्ये सहा एअरबॅग्ज सक्तीच्या करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गडकरींनी दिली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.