Maharashtra ministers Gujarat visit | ठाकरे सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागेचा विचार केला जात होता. सेमीकंडक्टर आणि ग्लास फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प राज्यात आला असता तर तब्बल दोन लाख रोजगारांची निर्मिती झाली असती. तसेच राज्यात १.५० लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

 

Gujrat CM
महाराष्ट्राचे मंत्री गुजरातमध्ये जाणार

हायलाइट्स:

  • उद्योगमंत्री उदय सामंत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार
  • गुजरातमधील चांगल्या योजनांची माहिती घेणार
मुंबई: पुण्यातील तळेगाव येथे प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले होते. या सगळ्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री आणि अधिकारी हे सोमवारी गुजरातच्या दौऱ्यावर गेले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि सुधीर मुनगंटीवार हे गुजरातमध्ये जाऊन तेथील योजनांचा आढावा घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारीही उपस्थित असतील.

उद्योगमंत्री उदय सामंत हे अहमदाबाद येथे गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांची भेट घेतील. गुजरातमध्ये सध्या कोणत्या चांगल्या योजना राबवल्या जात आहेत, याविषयी उदय सामंत आणि मुनगंटीवार हे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतील. जेणेकरून यापैकी काही योजना महाराष्ट्रात राबवल्या जाऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेला असला तरी गुजरातमधील विकासाचा पॅटर्न भविष्यात महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो. त्यामुळे सामंत-मुनगंटीवारांच्या गुजरात दौऱ्यात आणखी काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गेल्याने झालेलं नुकसान कसं भरून काढायचं? पुण्यातील तज्ज्ञांनी सांगितली आयडिया
ठाकरे सरकारच्या काळात वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासाठी तळेगाव येथील जागेचा विचार केला जात होता. सेमीकंडक्टर आणि ग्लास फॅब्रिकेशनचा हा प्रकल्प राज्यात आला असता तर तब्बल दोन लाख रोजगारांची निर्मिती झाली असती. तसेच राज्यात १.५० लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक झाली होती. मात्र, राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेला: रोहित पवार

राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने गुजरात पेक्षा ११ हजार कोटीच्या जादा सवलती फॉक्सकॉनला दिल्या होत्या . यासाठी लागणारी जागाही नक्की झाली असताना केवळ केंद्राने हा प्रकल्प गुजरातला गेल्यावर पॉलिसी बदलल्याने फॉक्सकॉन गुजरातला गेला आणि आता तिथे जागा शोधण्यापासून कामाला सुरुवात केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला.
महाराष्ट्र नको, गुजरातला प्रकल्प उभारु, सल्ला कुणाचा? वेदांताच्या अध्यक्षांची ‘टाइम्स’ला सनसनाटी मुलाखत
महाराष्ट्रात फॉक्सकॉन उभा राहणार हे नक्की होत असताना केंद्र सरकार आणि फॉक्सकॉनचे मालक यांची भेट झाली . यानंतर सेमीकंडक्टर उद्योगाला जी १२ हजार कोटींची सवलत होती ती अट केंद्राने काढून टाकल्याने आता हि कंपनी जेवढे कोटी नफा मिळवेल तेवढी तिला सवलत असणार आहे . केंद्राने हि सवलतीची मर्यादा काढून टाकल्यानेच फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचे रोहित पवार यांनी सांगितले . फॉक्सकॉनवरून भाजप नेते लंगडे खुलासे करत असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here