नवी दिल्ली: विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPIs) भारतीय शेअर बाजारातील प्रवाह या महिन्यात मंदावला आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये केवळ ८,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी भारतीय शेअर बाजारात ५१,००० कोटी रुपये ओतले होते. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ व्ही.के. विजय कुमार म्हणाले की, डॉलर मजबूत होत असताना विदेशी गुंतवणूकदार आक्रमक खरेदी करणार नाहीत.

राकेश झुनझुनवाला यांच्या शेअर्सची रेकॉर्डब्रेक कमाई, एक लाख गुंतवले अन् ६० टक्के नफा मिळाला
परकीय गुंतवणूकदरांची गती का मंदावली?
अमेरिकन मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात आणखी वाढ होण्याची शक्यता, मंदीची भीती, रुपयाचे अवमूल्यन आणि रशिया-युक्रेनमधील वाढता तणाव यांचा परिणाम एफपीआय चलनावर होईल. वेल्थ अॅडव्हायझर्स एलएलपीचे सह-संस्थापक बसंत माहेश्वरी यांनी ही माहिती दिली आहे. डिपॉझिटरी डेटानुसार ऑगस्टच्या सुरुवातीला FPI ने इक्विटीमध्ये निव्वळ ५१,२०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर जुलैमध्ये त्यांची इक्विटीमध्ये गुंतवणूक सुमारे पाच हजार कोटी रुपये होती.

गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले, IPO खुला होताच घसरत्या बाजारातही मिळाला ३६ टक्के परतावा
जुलैमध्ये FPI निव्वळ खरेदीदार बनले
सलग नऊ महिने पैसे काढल्यानंतर विदेशी गुंतवणूकदार जुलैमध्ये निव्वळ खरेदीदार बनले. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून FPI मधून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ पर्यंत त्यांनी एकूण २.४६ लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले होते. तर आकडेवारीनुसार १ ते २३ सप्टेंबर दरम्यान FPIs ने ८,६३८ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.

गुंतवणूकदारांना धक्का…शेअर बाजारात मोठी घसरण; बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळले
या महिन्याच्या सात सत्रात विक्री
मात्र, या महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारांमध्ये एफपीआयच्या भूमिकेत बरीच अस्थिरता दिसली आहे. त्यांनी या महिन्यात सात ट्रेडिंग दिवसांवर विक्री केली आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सत्रांमध्ये FPIs ने शेअर बाजारातून २,५०० कोटी रुपये काढले आहेत. अलीकडच्या काही दिवसांत डॉलरच्या मजबूतीमुळे आणि अमेरिकेतील रोख्यांवर वाढत्या उत्पन्नामुळे एफपीआयची विक्री वाढली आहे.

पुन्हा दरवाढीची शक्यता
हिमांशू श्रीवास्तव असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च, मॉर्निंगस्टार इंडिया म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेच्या आक्रमक भूमिकेमुळे गुंतवणूकदारांनी भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठेत जोखीम घेणे टाळले आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हने पुढील बैठकीत चौथ्यांदा व्याजदर ०.७५ टक्क्यांनी वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here