धूम्रपान करण्याची सवय वाढत आहे
नितीन कामथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फिटनेसबाबत आव्हान दिलं आहे. कामथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फिटनेस ट्रॅकरवर रोजचे टार्गेट निश्चित करण्याचे आव्हान दिलं आहे. कामथ यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपल्यापैकी बहुतेकजण घरून काम करत आहेत. बसण्याची आणि धूम्रपान करण्याची सवय सतत वाढत आहे. म्हणूनच आम्ही आमच्या टीमला सक्रिय करण्यासाठी काहीतरी करत आहोत.
बोनससाठी करावं लागेल हे काम
कामथ यांच्या मते, कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा बोनस पगार मिळविण्यासाठी त्यांच्या दररोजच्या फिटनेस उद्दिष्टांपैकी ९० टक्के टार्गेट गाठावे लागेल. यासोबतच यामध्ये १० लाख रुपयांचा लकी ड्रॉही ठेवण्यात आला आहे. कामथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, झिरोधामध्ये आपल्या नवीन फिटनेस ट्रॅकर्सवर दररोज टार्गेट सेट करायचं आहे. जो कर्मचारी एका वर्षासाठी दररोजच्या उद्दिष्टाच्या ९० टक्केही साध्य करण्यात यशस्वी ठरतो, त्याला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला जाईल.