बारामती : बारामती तालुक्यातील एका आईवर डोळ्यासमोरच मुलाचा मृत्यू पाहण्याची दुर्दैवी वेळ ओढावली आहे. काऱ्हाटी येथे २० वर्षीय तरुणाचा कऱ्हा नदीपात्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शुभम संतोष खंडागळे असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.
दरम्यान, शुभम हा सातारा येथे पोलीस भरती अॅकॅडमीत शिक्षण घेत होता. सुट्टी असल्याने तो गावी आला होता. कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या मृत्यूने खंडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.