इझेव्हस्क : मध्य रशियातील इझेव्हस्क शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात पाच मुलांसह नऊ जण ठार झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत दोन सुरक्षा रक्षक आणि शैक्षणिक संस्थेचे दोन शिक्षक, तसेच पाच अल्पवयीन मुलांसह नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. असे रशियन तपास समितीने टेलिग्रामवर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एएफपीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने देखील आत्महत्या केली आहे.

आज सकाळी एका बंदूकधाऱ्याने शाळेवर हल्ला केला होता. उदमुर्तिया प्रदेशाचे गव्हर्नर अलेक्झांडर ब्रोचालोव्ह यांनी एक व्हिडिओ जारी केला की, अज्ञात हल्लेखोराने या प्रदेशाची राजधानी इझेव्हस्क येथील एका शाळेत घुसून सुरक्षा रक्षक आणि तेथे उपस्थित असलेल्या काही मुलांची हत्या केली. पीडितांमध्ये लहान मुले आहेत. काही लोकंही जखमी झाले आहेत.

तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप
ज्या शाळेत हा हल्ला झाला, त्या शाळेत पहिली ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. गव्हर्नर आणि स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्ला करणाऱ्या व्यक्तीन देखील स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

हल्लेखोराबाबत सध्या कोणतीही माहिती नाही

दरम्यान, शाळा रिकामी करण्यात आली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे, असं अधिकाऱ्याने सांगितले. हल्लेखोर कोण होता आणि त्याचा हेतू काय होता याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. इझेव्हस्कमध्ये ६ लाख ४० हजार लोक राहतात. हे मॉस्कोच्या पूर्वेस सुमारे ९६० किमी अंतरावर मध्य रशियाच्या उरल पर्वत प्रदेशाच्या पश्चिमेस आहे.

६०० ई-मेल आणि ८० फोन कॉलनंतर भारतीय युवकाला मिळाली थेट वर्ल्ड बँकेने नोकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here