Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Sep 26, 2022, 5:39 PM

Pune News : पुण्यातील डेक्कन नदी पात्रात एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी गणेश घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की झेड ब्रिजखाली नदी पात्रात एक मृत अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे.

 

Pune Crime News
Pune News : रात्री घरातून बाहेर पडला, दुसऱ्या दिवशी नदी पात्रात सापडला, भावाच्या मारेकऱ्यांवरच संशय

हायलाइट्स:

  • नदी पात्रात तरुणाची हत्या
  • धारधार शस्त्राने केली हत्या
  • पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातील डेक्कन नदी पात्रात एका तरुणाचा धारधार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे. गणेश सुरेश कदम (वय ३५ रा अमृतेश्वर मंदिर शेजारी शिवार पेठ) काल रात्री ७ वाजता घरातून बाहेर पडला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी गणेश घरी परतला नसल्याने त्याच्या घरच्यांनी शोध घेतला. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की झेड ब्रिजखाली नदी पात्रात एक मृत अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. घरच्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची शहानिशा केली. मृत व्यक्तीची ओळख पटवून घेतली असता हा व्यक्ती गणेश सुरेश कदम आहे अशी माहिती त्याच्या घरच्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश सुरेश कदम मृत व्यक्ती हा कडपे इस्त्री करण्याचा व्यवसाय करतो. २०१४ साली गणेशच्या मोठा भावाची हत्या करण्यात आली होती. ते आरोपी आता निर्दोष म्हणून सुटले आहेत. त्यांनीच गणेशची हत्या केल्याचा संशय घरच्यांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी गणेशचा एक मोबाईल ताब्यात घेतला असून दुसरा मोबाईल गायब आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेण्याचं काम डेक्कन पोलीस स्टेशन करत आहे.

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुंबई हायकोर्टाला महत्त्वाचे आदेश

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here