अमरावती : हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर हे रविवारी अंजनगांव सुर्जी येथील मघात दर्शनासाठी आले होते. मात्र परत जाताना शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांच्या वाहनावर हल्लाबोल करत घोषणा देण्यात आल्या. या घटनेने जिल्ह्यात चांगलीच राजकीय खळबळ उडाली होती. याप्रकरणी अखेर १० शिवसैनिक पोलिसांना शरण आल्याची माहिती आहे.

राड्यानंतर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अंजनगाव सुर्जी येथे पोलीस ठाण्यासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी करत हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली होती. तसंच अंजनगाव पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी १५ ते २० शिवसैनिकांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले असून ११ जणांना ताब्यात घेतलं होतं. मात्र हे खरे हल्ले करणारे नाहीत, अशी माहिती शिवसेना जिल्हाप्रमुखांनी दिली होती. याप्रकरणी आता १० शिवसैनिकांनी आत्मसमर्पण केलं असून यात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिवटे आणि शिवसेना शहरप्रमुख राजू अकोटकर यांचा समावेश आहे.

ठाण्यातील टेंभी नाक्यावर आनंद दिघेंचे दोन कट्टर शिष्य पुन्हा आमने-सामने

‘आम्ही चॅलेंज स्वीकारलं, आता…’

आमदार संतोष बांगर यांनी जे चॅलेंज दिलं ते मी स्वीकारलं, आता त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महेंद्र दिवटे यांनी केली आहे. तसंच मी संतोष बांगर यांच्याविरुद्ध निवडणूक लढू शकतो आणि त्यांना हरवू शकतो, असं आव्हानही महेंद्र दिवटे यांनी दिलं आहे.

संजय राठोडांच्या कृतघ्नतेने महंत दुखावले, सुनील महाराज शिवबंधनात अडकणार

नेमकं काय घडलं होतं?

शिवसेनेतून बंडखोरी करत आमदार संतोष बांगर हे सर्वात शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सहभागी झाले होते. रविवारी दुपारी ३ वाजता आमदार बांगर अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनाकरिता आल्याची माहिती तालुक्यातील शिवसैनिकांना कळली. शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले. सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देत त्यांच्या गाडीवर बुक्या मारत गोंधळ घातला. यावेळी आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ नेमकं काय होत आहे, हे कळलं नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here