A suspicious boat found in Uran : उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे. या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली. उरण ते रेवस या अरबी समुद्रातील दोन बंदराच्या परिसरात उरणचे मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी हा प्रकार समोर आला आहे.

हायलाइट्स:
- उरणमध्ये संशयास्पद बोट आढळली.
- मस्त्यविभागाच्या अधिकारी गस्त घालताना आढळली बोट.
- अधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडली बोट.
उरणच्या मत्स्यव्यवसाय विभागाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर संशयित बोट उरणच्या करंजा बंदरात नांगरण्यात आली आहे. या बोटीचा उरण पोलिसांकडून तपास सुरू आहे. घटनास्थळाला उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी भेट दिली.
क्लिक करा आणि वाचा- रायगड किनारपट्टीवरील ५५ हेक्टर जमीन पाण्याखाली; मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या दहापट जमीन
बोटीत डिझेल आढळून आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सोमवारी बंदरात गस्ती घालीत असताना विना क्रमांकाची बोट आढळून आली असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती उरणचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी सुरेश बहुलगावे यांनी दिली.
क्लिक करा आणि वाचा- भिसे खिंडीत ट्रक-बाइकचा भीषण अपघात; ट्रक खिंडीत कोसळला, दुचाकीस्वार जागीच ठार
१८ ऑगस्ट रोजी हरिहरेश्वलाही सापडली होती बोट
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरमध्ये समुद्र किनाऱ्यावर गेल्या महिन्यात १८ ऑगस्ट रोजी एक बोट संशयास्पद स्थितीत आढळून आली होती. या बोटीत शस्त्रास्त्रे सापडली होती. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. ही बोट पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीनं किनाऱ्यावर आणली. या बोटीत एके-४७ रायफल आणि शस्त्रास्त्रं आढळून आल्याची माहिती मिळली होती.
क्लिक करा आणि वाचा- फिल्मी स्टाइलची कारवाई; एनसीबीचा अमली पदार्थाच्या तस्करीला मोठा धक्का; पकडला ४ कोटींचा गांजा
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.